कान्हूर पठार पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू एकूण ६७ सर्व उमेदवारी अर्ज ठरले वैध पारनेर प्रतिनिधी : कान्हूर पठार पतसंस्था ही महाराष्ट्रा...
कान्हूर पठार पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू
एकूण ६७ सर्व उमेदवारी अर्ज ठरले वैध
पारनेर प्रतिनिधी :
कान्हूर पठार पतसंस्था ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था असून या पतसंस्थेच्या ४०० च्या वर ठेवी आहेत. या संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान कान्हूर पठार मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सो. मर्यादित, कान्हूर पठार संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून एकूण १५ जागांसाठी निवडणूक होत आहे दि. १४ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्यास मुदत होती. एकूण ६७ उमेदवारी अर्ज भरले गेले. दि. १५ डिसेंबर रोजी एकूण ६७ अर्जांची छाननी झाली सर्व अर्ज हे वैध ठरले असून दि. २० डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
या निवडणुकीत प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे गट, स्वर्गीय दिलीपराव ठुबे गट, आमदार निलेश लंके गट यांच्या समर्थकांनी या निवडणुकीत आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.
COMMENTS