पारनेर तालुक्याचे आशादायी नेतृत्व डॉ. श्रीकांत पठारे.. गणेश जगदाळे/पारनेर पारनेर तालुक्याच्या सामाजिक राजकीय पटलावर चमकत असलेले सुसंस्कृत सु...
पारनेर तालुक्याचे आशादायी नेतृत्व डॉ. श्रीकांत पठारे..
गणेश जगदाळे/पारनेर
पारनेर तालुक्याच्या सामाजिक राजकीय पटलावर चमकत असलेले सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्व म्हणजे डॉ. श्रीकांत पठारे सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही केवळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याची डॉ. श्रीकांत पठारे यांना पहिल्यापासून आवड असल्यामुळे ते समाजकारण व राजकारण करत आहेत. पारनेर तालुक्यातील वडुले सारख्या ग्रामीण भागात आपल्या मूळ गावी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी ते पुणे या ठिकाणी गेले. वैद्यकीय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर डॉ. श्रीकांत पठारे यांनी काम केले. विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. तेव्हापासूनच डॉ. श्रीकांत पठारे हे चळवळीशी जोडले गेले. वडुले येथील असलेले पठारे कुटुंबीय हे एकत्रित कुटुंब या कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा पंचक्रोशीत खूप मोठी डॉ. श्रीकांत पठारे यांना एकूण पाच भावंडे सर्व सुशिक्षित सुसंस्कृत, कुटुंबाची त्यांच्या या राजकीय सामाजिक कामात असलेली साथ त्यांना यशाच्या दिशेने घेऊन आली आहे.
शिवसेनेच्या विचारांना प्रेरित होऊन माजी आमदार विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्यात सध्या डॉ. श्रीकांत पठारे हे सामाजिक काम करत आहेत. पारनेर पंचायत समितीचे सदस्य असलेले श्रीकांत पठारे हे आपल्या जवळा गणात व कानूर पठार गटामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहेत. आरोग्य, क्रीडा, क्षेत्रातील अनेक उपक्रम ते सध्या राबवत आहेत. जवळा परिसरामध्ये डॉ. पठारे यांनी आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे केली आहेत. माजी आमदार विजय औटी यांच्या माध्यमातूनही ते आता सक्रिय असून शासकीय योजना तसेच विकासात्मक काम करण्यामध्ये तालुक्यात ते सध्या पुढे आहेत. जवळा, गुणोरे, गांजीभोयरे, वडुले पिंपरि जलसेन या ग्रामीण भागांमध्ये त्यांनी अनेक विकासात्मक कामे मार्गी लावली आहेत या ठिकाणचे रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी ते सर्वसामान्य लोकांचे काम करत आहेत.
शिवसेना या पक्षातील ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही नीती त्यांनी स्वीकारली असून पारनेर तालुक्यात ते सामाजिक कामाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत. तालुक्यात त्यांच्याकडे एक आशादायी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. राजकारण करत असताना कधीही व्यक्तीद्वेष न करणारे डॉ. श्रीकांत पठारे हे तालुक्यात एक आक्रमक सुसंस्कृत सुशिक्षित युवा चेहरा म्हणून समोर येत आहे. तालुक्यात विकासाची व सामाजिक कामे करत असताना ते संघटनात्मक पातळीवरही चांगलेेे काम करत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना डॉ. पठारे यांनी संपूर्ण पारनेर तालुक्यात शिवसेनेचे मोठे संघटन उभे केले आहे. शिवसेनाा युवा सेनेच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत पठारेे यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार विजयराव औटी यांच्याा मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक युवक व युवती शिवसेनेेशी जोडले गेले आहेत व शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करत असून हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सामाजिक विचार खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत व सर्वसामान्य्य जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी खऱ्या अर्थाने डॉ. श्रीकांत पठारे यांनी कंबर कसली आहे.
डॉ. श्रीकांत पठारे हे खऱ्या अर्थाने आरोग्य सेवेच्या माध्यमातून उत्तम काम करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या काळात डॉ. श्रीकांत पठारे यांनी केलेले काम हे एक देवदूत पेक्षा ही कमी नाही. कोरोनाच्या संकटात डॉ. श्रीकांत पठारे यांनी आपल्या स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये कोविड सेंटर तयार करून असंख्य रुग्णांना मोफत उपचार दिले. कोरोनाच्या दरम्यान डॉ. श्रीकांत पठारे यांना सामाजिक कामांमध्ये त्यांच्या पत्नी डॉ. पद्मजा पठारे यांचीही मोलाची साथ आहे सर्वसामान्य गरीब जनतेला आरोग्य सेवा मोफत पुरविण्यासाठी डॉक्टर श्री व सौ पठारे दाम्पत्य नेहमी पुढे असते कोरोना च्या दरम्यान पारनेर या ठिकाणी कोविड सेंटर उभारून पारनेर तालुक्यातील सहा हजार कोरोना पॉझिटिव रुग्णांना आधार दिला डॉ. श्रीकांत पठारे कोरोना रुग्णांची सेवा करताना स्वतःच्या आरोग्याचा विचार केला नाही.
यांनी केलेले कोरोणा काळातील काम निश्चितच सर्वसामान्य लोकांना आधार देणारे होते. कोरोणाच्या काळात प्रसिद्धीपासून अलिप्त राहात रुग्णसेवा करणारे डॉ. श्रीकांत पठारे हे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीचा बडेजाव न करणारे सर्वसामान्य नेतृत्व आहे.
डॉ. श्रीकांत पठारे हे क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, जुदो, कराटे स्पर्धांच्या माध्यमातून नावलौकिक मिळवणार्या खेळाडूंना तसेच शालेय विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देत असतात व येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात.
डॉ. श्रीकांत पठारे हे आपल्या कानूर पठार सारख्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा पूर्वत असून अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे ही घेत आहे. त्या माध्यमातून ते गरीब व सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करत आहेत. आज पर्यंत विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे कानूर पठार, किन्ही करंडी, बाभुळवाडे, वडजिरे पानोली, वडुले, पिंपळनेर, सांगवी सूर्या, गांजीभोयरे, हतलखिंडी, पठारवाडी, जवळा, गडदवाडी, सिद्धेश्वरवाडी, देवीभोयरे, चिंचोली, गांजेवाडी या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अस्थीरोग, स्रीरोग, हृदयरोग, मधुमेह, दमा, मुळव्याध, भंगदर, कान-नाक-घसा यांचे विकार, पोटाचे विकार, इत्यादी आजारांची तपासणी मोफत केली गेली आहे व जात आहे.
आरोग्य सेवेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात काम करणारे डॉ. श्रीकांत पठारे यांनी आरोग्यदूत बनूनजी सेवा सर्वसामान्य जनतेला दिली आहे. त्यामुळे गोरगरीब जनता त्यांना देवदूतच मानत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता डॉक्टर श्रीकांत पठारे यांना तालुक्याचे विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे एक आशादायी नेतृत्व म्हणून पाहत आहे. अशा या युवा उमद्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
सर्वसामान्यांचा आधार बनले डॉ. श्रीकांत पठारे..
पारनेर तालुक्यात आरोग्य सेवेच्या माध्यमातून काम करणारे पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे हे सर्वसामान्य जनतेसाठी आधार बनले आहेत. आरोग्य सेवेच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले काम आज तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला असून कोरोणा काळातच त्यांनी केलेली सेवा ही सर्वसामान्य गरीब जनतेला आधार देणारी आहे. डॉ. श्रीकांत पठारे हे खऱ्या अर्थाने आरोग्य सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे आधार बनले आहेत.
सामाजिक कार्यात कुटुंबाची व सहकाऱ्यांची साथ..
पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे करत असलेल्या सामाजिक कामांमध्ये खऱ्या अर्थाने त्यांना आपल्या कुटुंबाची व सहकाऱ्यांची मित्र परिवाराची व शिवसेना पदाधिकार्यांची मोठी साथ असल्याचे दिसते त्यामुळे त्यांची सामाजिक काम हे अहोरात्र जनतेसाठी सुरू असल्याचे दिसते आहे कुटुंबाच्या व सहकाऱ्यांच्या विश्वासावर रात्रंदिवस सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य सेवा देणारे डॉ. श्रीकांत पठारे हे एक त्यामुळे सामाजिक आदर्श बनले आहेत..
तालुक्यात शिवसेना संघटन वाढीसाठी कसली कंबर..
पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी शिवसेना पक्ष संघटन वाढीसाठी संपूर्ण तालुक्यात आता कंबर कसली असल्याचे दिसते भविष्यात संघटनात्मक पातळीवरही ते चांगले काम उभे करतील व शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असतील आज शिवसेना युवा सेनेचे अनेक पदाधिकारी डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या माध्यमातून तालुक्यात काम करत आहेत.
डॉ. श्रीकांत पठारे आरोग्यदूत...
डॉ. श्रीकांत पठारे यांनी कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे मोठे काम केले. खऱ्या अर्थाने रुग्णाचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी डॉ. पठारे यांनी प्रयत्न केले. त्यांना त्यांच्या पत्नी डॉ पद्मजा पठारे यांची मोलाची साथ लाभली. कोरोना रुग्णांसाठी जे काम उभे केले त्यामुळे ते तालुक्यात आरोग्यदूत म्हणून समोर आले आहेत..
सौभाग्यवती डॉ. पद्मजा पठारे यांची समाज कार्यात मोलाची साथ..
पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांना त्यांच्या पत्नी सौभाग्यवती डॉ. पद्मजा पठारे यांची समाज कार्यामध्ये मोठी मोलाची साथ आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून काम करत असताना डॉ. पद्मजा पठारे या डॉ. श्रीकांत पठारे यांना मोलाची महत्वपूर्ण साथ देत आहेत. यामुळे डॉ. श्रीकांत पठारे यांचे सामाजिक आरोग्य विषयक कार्य आणखीन बहरत आहे.
कार्यसम्राट माजी आमदार विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे कार्य..
पारनेर तालुक्यात आदर्श पंचायत समिती सदस्य असलेले डॉ. श्रीकांत पठारे यांचे विकासात्मक कार्य हे पारनेर तालुक्याचे विकासपुरुष कार्यसम्राट माजी आमदार विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून विकासाच्या दिशेने ते आता सर्व सामान्य जनतेला घेऊन जात आहे जवळा व कानूर पठार परिसरामध्ये अनेक विकासाची कामे ते सध्या करत असून या सर्व कामांमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कार्यसम्राट माजी आमदार विजयराव औटी यांची त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळत आहे.
COMMENTS