अखेर वडगाव दर्या येथील परांडे मळ्यातील विद्युत रोहित्र सुरू भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष सुभाष परांडे यांच्या प्रयत्नांना यश पारने...
अखेर वडगाव दर्या येथील परांडे मळ्यातील विद्युत रोहित्र सुरू
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष सुभाष परांडे यांच्या प्रयत्नांना यश
पारनेर प्रतिनिधी :
वडगाव दर्या मधील परांडे मळा येथे विद्युत रोहित्र जळाल्याने 30 ते 40 घरे गेल्या महिन्यापासून अंधारात होती भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तसेच वडगाव दर्या येथील स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून महावितरण कार्यालयावर कान्हूर पठार या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पारनेर तालुका युवक अध्यक्ष सुभाष परांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न असल्याने विद्युत रोहित्र चालू झाले नाही मार्गी लागला आहे. यामध्ये पारनेर तालुका विद्युत वितरण समितीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे यांनी मध्यस्थी केली होती.
विद्युत रोहित्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे यावेळी विद्युत रोहित्र सुरू होण्यासाठी महावितरण अधिकारी वैभव भुजबळ महावितरण कर्मचारी शेखर सटाले व वायरमन कर्मचारी बुवा यांनी शेतकऱ्यांचे हित पाहून तत्परतेने योग्य अशी मदत केली त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी तसेच वडगाव दर्या चे अपक्ष ग्रामपंचायत सदस्य भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पारनेर तालुका युवक अध्यक्ष सुभाष कचरू परांडे, पै. सुरज नवले, अमोल ठुबे ग्रामपंचायत सदस्या सविता तुकाराम परांडे, सोमनाथ नाना नवले, गणेश चिकणे, अशोक परांडे, सुनील बाळू परांडे ,पंढरी परांडे, लक्ष्मण परांडे ,रोहिदास परांडे दत्तात्रय परांडे, बाबाजी पारधी, नाना पारधी, राजेंद्र सोनवणे, संपत परांडे, बबन परांडे, भास्कर परांडे ,प्रभू गुंड, लहू परांडे, रखमा परांडे, विलास परांडे या ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन करत आभार व्यक्त केले. व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पारनेर तालुका युवक अध्यक्ष सुभाष फरांडे यांनी संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी व समस्यांसाठी यापुढील काळात काम करत असताना मी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नियमित योग्य भूमिका घेऊन काम करणार आहे.
सुभाष कचरू परांडे
(अपक्ष ग्रामपंचायत सदस्य वडगाव दर्या)
(तालुका अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी युवक संघटना, पारनेर)