कुरुंद मध्ये बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचा आनंद साजरा पारनेर प्रतिनिधी : बैलगाडा शर्यत अखेर सुरू झाली गेल्या सात वर्षापासून बैलगाडा शर्यत वरती...
कुरुंद मध्ये बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचा आनंद साजरा
पारनेर प्रतिनिधी :
बैलगाडा शर्यत अखेर सुरू झाली गेल्या सात वर्षापासून बैलगाडा शर्यत वरती बंदी होती. अखेर सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कुरुंद ता-पारनेर येथील प्रसिद्ध गाडामलक पै.विश्वनाथ केरू शेंडगे यांनी सहकार्यासोबत बैलांची मिरवणूक काढून,फटाके फोडून व पेढे वाटून हमालवाडी कुरुंद येथे आनंद साजरा केला.
अनेक दिवसापासून ची प्रतीक्षा आता या ठि.काणी थांबली असून शेतकरी वर्गामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं ही वाचले पाहिजे यासाठी बैलगाडा मालक प्रतीक्षेत होते यावेळी बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे शेतकरी वर्ग व बैलगाडा मालकांनी आभार मानले आहेत.
यावेळी गाडामालक विश्वनाथ शेंडगे,शिवाजीराव खेमनर,दीपक शिंदे,पै सचिन शेंडगे , पै.राहुल शेंडगे, बाबू कोपनर, पै सुमित शिंदे,माऊली शिंदे बाप्पू खेमनर, ऋषिकेश चित्तर , नितीन शेंडगे, अतुल शिंदे, विकास रुपनर, शरद महाराज रुपनर, लभडे, ग्रामपंचायत सदस्य निलेश शेंडगे व बैलगाडा शौकीन उपस्थित होते
COMMENTS