वासुंदे पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला; निवडणूक एकतर्फी होणार की चुरशीची ! सुजित झावरे पाटील गटाचे विलास सखाराम साठे सर रिंगणात पारनेर...
वासुंदे पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला; निवडणूक एकतर्फी होणार की चुरशीची !
सुजित झावरे पाटील गटाचे विलास सखाराम साठे सर रिंगणात
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वासुंदे ग्रामपंचायतची एका रिक्त जागेसाठी वार्ड क्रमांक दोन मध्ये पोटनिवडणूक लागली असून या निवडणुकीत सुजित झावरे गटाचे सुशिक्षित उमेदवार श्री विलास सखाराम साठे सर चिन्ह नारळ तर आमदार निलेश लंके गटाचे श्री विशाल बबन सोनवणे चिन्ह बादली हे एकमेकांसमोर उभे आहेत.
सुजित झावरे पाटील गटाचे श्री विलास सखाराम साठे सर यांच्या प्रचाराचा नारळ वासुंदे येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे फुटला आहे. वार्ड क्रमांक 2 मध्ये होत असलेली ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.
दरम्यान सुजीत झावरे पाटील गटाचे सुशिक्षित सुसंस्कृत असलेले श्री विलास सखाराम साठे सर यांच्या विजयाची खात्री या निवडणुकीत असल्याचे समजते. ही निवडणूक एकतर्फी असल्याचे बोलले जात आहे. उमेदवार श्री विलास सखाराम साठे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा.ठ. झावरे, प्रगतशील शेतकरी भाऊ सैद, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन दिलीप पाटोळे, पो. मा. झावरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, गजाननशेठ झावरे, बाळासाहेब झावरे, सुदाम शिर्के ग्रामपंचायत सदस्य रामदास झावरे, दत्तात्रय बर्वे, भिमाजी गायखे, मारुती उगले, राजू शिर्के, सोन्याबापु बर्वे, शांताराम साठे, गणेश शिरतार, पारखे बाबा, ममता साठे, शंकर साठे, विजय साठे, सचिन सैद, संग्राम झावरे, बाळू टोपले पोपट साठे,
एकनाथ हिंगडे, तुकाराम साठे, प्रसाद झावरे, भाऊसाहेब झावरे, बाळासाहेब साळुंके, पोपट हिंगडे, तुकाराम पाटील साळुंके, अरुण वाबळे, बबनराव वाबळे, दत्तात्रय वावरे, पोपट ठुबे, सुदाम भालके, हरिभाऊ दुधावडे, बाळासाहेब हिंगडे सर, बाळासाहेब साठे, गोविंद ठुबे, राजेश सावंत, निखिल दाते, बाबाजी ठुबे सर, विठ्ठल साठे, तबाजी टोपले गोपीनाथ ठुबे, गणेश बर्वे, तुकाराम वाळुंज, लक्ष्मण झावरे , सुरेश पाटील , सुभाष शिंदे, भास्कर दाते, कचरू दाते, पांडुरंग टोपले, आबाजी झावरे, आबासाहेब वाळुंज, तळेकर गुरुजी लहू बर्वे, बाबाजी हिंगडे भाऊसाहेब हिंगडे, शिवाजी भालेकर, मेरचंद जाधव, शिवाजी गायखे, दत्तात्रय गांगड, बन्सी केदार, पांडुरंग टोपले, व यावेळी समस्त ग्रामस्थ वासुंदे मोठ्या संख्येने उपस्थित होते.