--> विजय औटी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार ! | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

विजय औटी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार !

विजय औटी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार ! पारनेर नगरपंचायत नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर; नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी पारनेर/प्रत...

विजय औटी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार !

पारनेर नगरपंचायत नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर; नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी


पारनेर/प्रतिनिधी : 
   नगर पंचायतीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आमदार नीलेश लंके यांचे निकटवर्तीय विजय सदाशिव औटी यांची पारनेरच्या नगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान पारनेरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे समजल्यावर औटी यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी केली.


नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागांवर विजय मिळवून नगर पंचायतीतील सर्वात मोठा पक्ष बनला होता. त्यानंतर आमदार लंके यांनी तातडीने हालचाली करून तीन अपक्ष नगरसेवकांना गळाला लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व तीन अपक्ष नगरसेवक अशी दहा सदस्यांची गटनोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गटनेतेपदी विजय औटी यांची तर उपगटनेतेपदी सुरेखा भालेकर यांची निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे नगर पंचायतीत सत्ता स्थापन करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मार्ग मोकळा झाला. 


या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, आरक्षण काय निघणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. आज (गुरुवार) मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या सोडतीत पारनेर नगर पंचायतीचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने नगराध्यक्षपदावर सर्वसाधारण प्रवर्गातील पुरूष नगरसेवकाची निवड होणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार विजय औटी यांची नगराध्यक्षपदी निवड होणार असल्याचे मानले जात आहे.


तीन वर्षांपूर्वी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पारनेर दौऱ्यादरम्यान झालेल्या गोंधळाच्या व वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तत्कालीन पारनेर तालुका प्रमुख नीलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी विजय औटी आणि त्यांचे बंधू तत्कालीन नगरसेवक नंदकुमार औटी यांनी पारनेर शहरातून खंबीर साथ दिली. तत्कालीन आमदार विजय औटी यांच्या पारनेर गावात नीलेश लंके यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपत होती. त्यात औटी बंधूचा क्रमांक वरचा होता. लंके यांना साथ देण्याच्या निर्णयाचे राजकीय व व्यावसायिक दुष्परिणाम औटी कुटुंबियांना भोगावे लागले. त्याची पर्वा न करता औटी बंधूंनी विधानसभा निवडणुकीतही आमदार नीलेश लंके यांना पारनेर शहरात खंबीर साथ दिली. औटी बंधूंच्या या निष्ठेचे फळ त्यांना नगराध्यक्षपदाच्या रुपाने मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या तीन पुरुष नगरसेवक आहेत. विजय औटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत सदस्य आहेत. नितीन अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष तर भूषण शेलार शहर विकास आघाडीचे अपक्ष नगरसेवक आहेत. शेलार अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षीत असलेल्या प्रभागातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे आमदार लंके यांचे निकटवर्तीय व निष्ठावान म्हणून नगरसेवक विजय औटी नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.




COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: विजय औटी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार !
विजय औटी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार !
https://lh3.googleusercontent.com/-6GOm2fSh2iM/YfNZVl6Oq_I/AAAAAAAALx0/CWHHjBylUYQN8r18YMIdlOD8DjchCdoZACNcBGAsYHQ/s1600/IMG-20220127-WA0039.jpg
https://lh3.googleusercontent.com/-6GOm2fSh2iM/YfNZVl6Oq_I/AAAAAAAALx0/CWHHjBylUYQN8r18YMIdlOD8DjchCdoZACNcBGAsYHQ/s72-c/IMG-20220127-WA0039.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/01/blog-post_57.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/01/blog-post_57.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content