--> सचिन वराळ पाटील व त्यांचे सहकारी विकासकामांसाठी अग्रेसर : मा. उपसभापती बबुशा'आण्णा वरखडे | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

सचिन वराळ पाटील व त्यांचे सहकारी विकासकामांसाठी अग्रेसर : मा. उपसभापती बबुशा'आण्णा वरखडे

निघोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या माध्यमातून दि.२६ जानेवार...

निघोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या माध्यमातून दि.२६ जानेवारी रोजी बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा (आण्णा ) वरखडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांचे सहकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निघोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील विकासकामांचे भूमिपूजन

सचिन वराळ पाटील व त्यांचे सहकारी विकासकामांसाठी अग्रेसर

बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा (आण्णा )वरखडे



पारनेर प्रतिनिधी
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामवैभवात भर घालण्यासाठी विकासकामे जोरात सुरू केली असून येत्या पाच वर्षात निघोज व परिसराचा विकासाभिमुख कायापालट होणार असल्याची ग्वाही बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा ( आण्णा ) वरखडे यांनी दिली आहे.


जिल्हा परिषद सदस्या श्रीम.पुष्पाताई संदिप वराळ पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मौजे.निघोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत दुरुस्ती या कामाचा भूमिपूजन शुभारंभ पारनेर बाजार समितीचे मा.उपसभापती श्री.बबुशाआण्णा वरखडे यांच्या शुभहस्ते व पंचायत समिती सदस्य श्री.दिनेशदादा बाबर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी वरखडे उपस्थीतांना मार्गदर्शन करताना बोलत होते.


यावेळी  संदिप पाटील जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिनभाऊ वराळ पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष मंगेशदादा लाळगे,उपसरपंच माऊलीशेठ वरखडे, निघोज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश खटके,डॉ. रोहिणी डोणे,मा.ग्रा.पं.सदस्य भास्करराव वराळ पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव लामखडे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वराळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सचिव ठकाराम गायखे, अल्पसंख्याक समाजाचे नेते व पारनेर तालुका मुस्लिम समाजाचे नेते अस्लम इनामदार,गजानन ठुबे, उत्तमराव लामखडे, विलासराव हारदे,सुनिल उचाळे,अर्जुन लामखडे, निलेश घोडे,रविंद्र लंके,सागर लाळगे,इंजि.अमीर शेख,दादु कवाद,कोंडीभाऊ वरखडे,श्रीम.गायकवाड़ सिस्टर,श्रीम.नागरे सिस्टर,मोहन बोरुडे,विशाल केदारी,आशा लामखडे,खैरे ताई,आशा सेविका द्वारका राऊत,उषा राऊत,सोनल राऊत,सोनल लामखडे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 



माजी उपसभापती वरखडे यावेळी म्हणाले गेली पाच वर्षाच्या कारकिर्दीत माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांची उणीव भरून काढण्यासाठी सचिन वराळ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकासकामांना मोठ्या प्रमाणात गती दिली.जनसंपर्क मोठ्या प्रमाणात ठेउन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवीले.गोरगरीबांच्या मदतीसाठी तप्तरतेने काम केले.म्हणून जनतेने मोठ्या विश्वासाने ग्रामपंचायत सत्ता सचिन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना दिली.येत्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागतील व गाव व परिसराचा कायापालट होईल असा विश्वास वरखडे यांनी व्यक्त केला. पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती देताना सांगितले की जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या माध्यमातून आळकुटी निघोज जिल्हा परिषद गटात फार मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.


संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली पाच वर्षात पंचायत समिती व जिल्हा परिषदकडे सातत्याने विकासकामांचा पाठपुरावा केला.म्हणून ही विकासकामे मार्गी लागली असून यापुढे सुद्धा पुढील पंचवार्षिक मध्ये जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती या माध्यमातून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कार्यक्षमतेने विकासकामे करणार असल्याची ग्वाही बाबर यांनी दिली आहे. 


संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी सांगितले की ग्रामपंचायत निवडणूक असो किंवा कोनतीही निवडणूक असो आपण व आपले सहकारी सातत्याने सामाजिक भावनेतून काम करीत असतो म्हणून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनला जनतेचा आशिर्वाद सातत्याने मिळत असतो.लोकभावनेतून काम करणे हे आपल्यसाठी महत्वपूर्ण आहे.अशापद्धतीने जनतेच्या प्रश्नांसाठी आपले कष्ट सार्थकी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याची ग्वाही वराळ पाटील यांनी दिली आहे.


COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: सचिन वराळ पाटील व त्यांचे सहकारी विकासकामांसाठी अग्रेसर : मा. उपसभापती बबुशा'आण्णा वरखडे
सचिन वराळ पाटील व त्यांचे सहकारी विकासकामांसाठी अग्रेसर : मा. उपसभापती बबुशा'आण्णा वरखडे
https://lh3.googleusercontent.com/-WvOatBOinTE/YfD2BMUqtMI/AAAAAAAALuA/ED43zGB6fs8ErwKkVvcYHb2RAsz8_tufgCNcBGAsYHQ/s1600/IMG-20220126-WA0030.jpg
https://lh3.googleusercontent.com/-WvOatBOinTE/YfD2BMUqtMI/AAAAAAAALuA/ED43zGB6fs8ErwKkVvcYHb2RAsz8_tufgCNcBGAsYHQ/s72-c/IMG-20220126-WA0030.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/01/blog-post_91.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/01/blog-post_91.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content