टाकळी ढोकेश्वर येथील बनाई वस्ती जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर याठिकाणी बनाई वस्ती ...
टाकळी ढोकेश्वर येथील बनाई वस्ती जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर याठिकाणी बनाई वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, यावेळी लहान लहान विद्यार्थ्यांनी पारंपरिक वस्त्र परिधान करुन बनाई वस्ती व पायमोडे वस्ती या ठिकाणी फेरी काढली या फेरीचे मुख्य आकर्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी मिरवणूक होती. दोन्ही वस्तीतील महिलांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे पूजन केले. त्यानंतर पालखी मिरवणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनाई वस्ती याठिकाणी आली.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष ढोकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन विजयशेठ कटारिया, शांताराम किंनकर, गीताराम बांडे, गंगाराम बांडे, ज्ञानदेव गुरुजी, पायमोडे गुरुजी, प्रियंका सोमनाथ बांडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पप्पू पायमोडे, उपाध्यक्ष सचिन बांडे, वर्षा बांडे, इंदूताई पायमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे व समूह गीत साजरे केले
तर टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतील ग्रामपंचायत सदस्य सरपंच अरूनाताई खिल्लारी, बाळासाहेब खिलारी सर , दत्तात्रय निवडुंगे, सुनीताताई जयसिंग झावरे, रामभाऊ तराळ, आदी मान्यवरांनी आपण बनाई वस्ती शाळेत जिल्हा परिषद शाळेसाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून देऊ व भविष्यात शाळेविषयी कोणतेही काम आपण पूर्ण करू असे आश्वासन दिले. तर या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका श्रीमती नरवडे, दत्तात्रय चौरे, तसेच बनाई वस्तीतील ग्रामस्थ व पालक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS