वेब टीम : मुंबई स्मरणशक्ती, दुर्बलता, तसेच दृष्टिदोष दूर करण्यासाठी निसर्गाची देणगी असलेले लालबुंद सफरचंद आपल्या आरोग्यरक्षकाची भूमिका बजावत...
वेब टीम : मुंबई
स्मरणशक्ती, दुर्बलता, तसेच दृष्टिदोष दूर करण्यासाठी निसर्गाची देणगी असलेले लालबुंद सफरचंद आपल्या आरोग्यरक्षकाची भूमिका बजावत असते.
आजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफरचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला काही दिवसांतच बरे वाटते, तसेच अशक्तपणा आल्यानंतर दररोज सकाळ-सध्याकाळ कच्च्या सफरचंदाची भाजी व पोळी खायला द्यावी.
अशक्तपणा कमी होऊन ताजेतवाने वाटते. संध्याकाळी एक ग्लास सफरचंदाचा रस व रात्री अख्खे सफरचंद रोग्याला दिल्याने त्याची भूक शमली जाते. साधारण महिनाभर सफरचंद खाल्ल्याने स्नायूंना बळकटी येऊन दुर्बलता कमी होते.
दृष्टिदोष असल्यास ताज्या सफरचंदाच्या गोल गोल चकत्या करून दोन्ही डोळ्यांवर बांधाव्यात. त्याने डोळ्यांमधील जळजळ कमी होऊन दृष्टी तेज होते. दररोजच्या आहारात लोणी व ताजे सफरचंद यांचा समावेश असल्याने अनेक आजार बरे होतात. जुलाब, लघवीबाबतचे आजार नाहीसे होतात. त्वचेमधील कोरडेपणा नाहीसा होतो.
COMMENTS