वेब टीम : मुंबई आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी ...
वेब टीम : मुंबई
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातोय.
यावेळी राजकीय नेते मंडळीदेखील या उत्सवात भाग घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनीदेखील होळी उत्सवात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात अमित ठाकरेंनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. येत्या महापालिका निवडणुकीसाठी मनसेची ताकद वाढवण्यासाठी अमित ठाकरे यांनी कंबर कसल्याचे यावरून दिसून येत आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अमित ठाकरेंची हजेरी कशी, यामागे महापालिकेचे गणित तर नाही ना, अशाही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
आगामी काळात मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांत महापालिकेच्या निडवणुका आहेत. मुंबईतही या निवडणुकीसाठी युद्धपातळीवर तयारीला सुरुवात झाली आहे. होळी सणानिमित्ताने अमित ठाकरे यांनी वरळीत हजेरी लावल्याने त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.