तिखोल येथील विज पुरवठा सुरळीत करा : अरुणराव ठाणगे तिखोल ग्रामस्थांच्यावतीने महावितरणला निवेदन महावितरणकडून तिखोल ग्रामस्थांना वीज पुरवठा सुर...
तिखोल येथील विज पुरवठा सुरळीत करा : अरुणराव ठाणगे
तिखोल ग्रामस्थांच्यावतीने महावितरणला निवेदन
महावितरणकडून तिखोल ग्रामस्थांना वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार वीज उपकेंद्रा अंतर्गत तिखोल येथे ८५ द.ल.घ.फु. क्षमतेचा लघु पाटबंधारा तलाव असल्यामुळे बागायती पिके वटाना, कांदे व इतर भाजी पाला मोठ्या प्रमाणात असल्याने विज पुरवठ्याची गरज असते. परंतु विज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पारनेर बाजार समितीचे मा.सभापती अरुणराव ठाणगे व ग्रामस्थांनी केली.
या प्रसंगी मा. सरपंच सुभाष ठाणगे, मा. चेअरमन नागचंद ठाणगे,अश्र्वीन मंचरे, मा.कृषी अधिकारी लक्ष्मणराव ठाणगे, राजु ठाणगे, शिवाजी ठाणगे, बाळासाहेब ठाणगे, सुनिल ठाणगे, अशोक ठाणगे, गणेश ठाणगे, सुहास ठाणगे, भाऊसाहेब ठाणगे, रामदास ठाणगे, आनंदा ठाणगे, संकेत ठाणगे, अंबादास ठाणगे, मेजर सुनिल ठाणगे, मेजर योगेश ठाणगे, पोपट मंचरे, सतीश मंचरे,अशोक सावळेराम ठाणगे, योगेश ठाणगे, किरण सुंबरे, विनायक साळवे, संपत ठाणगे, राहुल ठाणगे, रावसाहेब मंचरे, अनिल ठाणगे, संतोष ठाणगे, अप्पा ठाणगे, अमोल मंचरे, किरण ठाणगे व शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
या प्रसंगी सहायक अभियंता श्री. आडभाई साहेब, भुजबळ साहेब, लाईनमन संदिप पवार यांनी शेतकऱ्यांच्या विज पुरवठा संदर्भातील भावना समजावून घेतल्या व साधारण पाच ते सहा मार्च पर्यंत विज पुरवठा सुरळीत होईल असे सांगितले. व इतर काही ज्या अडचणी आहेत त्या तातडीने सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.
तिखोल परिसरातील वीज पुरवठा काही दिवसापासून सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला शेतकर्यांसह महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या प्रश्न व समस्या मांडल्या यावेळी पाच ते सहा मार्च पर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन महावितरणचे प्रशासकीय अधिकारी श्री आडभाई साहेब यांनी दिले.
मा. सभापती अरुणराव ठाणगे
(कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर)
COMMENTS