आदिवासींचा संघर्षशील नेता सुजितराव झावरे पाटील शब्दांकन : ऋषिकेश गागरे पाटील (वनकुटे) पारनेर तालुक्यातील वासुंदे या ठिकाणी २३मार्च १९७...
आदिवासींचा संघर्षशील नेता सुजितराव झावरे पाटील
शब्दांकन : ऋषिकेश गागरे पाटील (वनकुटे)
पारनेर तालुक्यातील वासुंदे या ठिकाणी २३मार्च १९७८ साली स्व मा.आमदार वसंतराव दादा व माई यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले.
आणि ते रत्न म्हणजे युवकांचे आशास्थान मा.सुजितराव झावरे पाटील.
सुजित झावरे पाटील यांचे शिक्षण हे नगरमधील फिरोदिया काँलेजमध्ये झाले. खर तर त्यांना राजकारणापेक्षा गायनाची जास्त आवड आहे.
परंतु वडिलांच्या राजकीय वारसदार म्हणुन मा.सुजितदादांना राजकारणात प्रवेश करावा लागला.
झावरे पाटील कुटुंबाचे आणि आमचे संबंध तसे जवळपास ४० वर्षीपुर्वीचे आहेत. स्व मा.आमदार वसंतराव दादा आणि माझे आजोबा स्व रावसाहेब पाटील गागरे(मा.सरपंच) यांच्या संबंधामुळेच पुढे सुजितदादांशी खुप जवळचा संपर्क आला.
स्वत:चा मतदार संघ सोडुन वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी पंचायत समितीची निवडणूक लढवुन, विक्रमी मताधिक्याने ते विजयी देखील झाले.
राजकारणातील सुजित पाटलांची एक खासियत आहे. आणि ती म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मतदार संघातुन निवडणूक लढवुन निवडून आले आहेत...
दोन वेळा जिल्हा परिषदेमध्ये त्यांना काम करण्याची संधी जनतेच्या आशिर्वादाने मिळाली, त्या संधीचा पुरेपुर फायदा जनतेच्या सेवेसाठी त्यांनी केला...
राज्यातील सर्वात कमी वयाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होण्याचा मान देखील त्यांना मिळाली. राजकारणात देखील समाजकारण करणारी माणसे असतात याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे सुजित झावरे पाटील.
स्व मा.आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या पासुन ते सुजित पाटलांचा जिल्हा परिषदेचा काळ व आत्ता माईंची कारकीर्द यामध्ये वनकुटे गावाच्या विकासासाठी त्यांच्या अत्यंत सिंहाचा वाटा आहे.
वनकुटे गावातील पाणीयोजना असेल, गावातील आदिवासी बांधव गोरगरिबांच्या मुलांना या ठिकाणी मोफत शिक्षण मिळावा या हेतुने प्रगत विद्यालयाची स्थापना केली. तसेच ग्रामसचिवालय इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना, पशुवैद्यकीय निवासस्थान, केटिवेअर, बंधारे, संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे, ठाकरवाडी येथील गोसावीबाबा मंदिराचा सभामंडप, शाळा दुरुस्ती तास, पठारवाडी,भुलदरा या ठिकाणी देखील अनेक विकासकामे त्यांच्या माध्यमातून झाली आहेत. जवळपास कोट्यावधी रुपयांचा निधी हा वनकुटे गावासाठी त्यांनी दिला. यांसह वैयक्तिक लाभाच्या आदिवासी बांधवांसाठी अनेक योजना राबविल्या.
राजकारणात कडक शिस्तीची माणसे नसतात. असे म्हणतात, पंरतु याला सुजितदादा अपवाद आहे. कडक शिस्तीचे जरुर असतील. पण तितकेच ते भावनिक आणि प्रेमळ देखील आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात यश अपयश हे येतच असते. परंतु कठिण परिस्थितीत देखील हतबल न होता आपले काम निस्सीम भावनेने करतात.
कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना देखील विकास-कामांबरोबरच कार्यकर्तेंचा संच टिकवण्याचे काम त्यांनी केले.
माझा त्यांच्याबद्दलचा एक अनुभव असा आहे की, कोणतेही काम असो, अगदी विकासाचे किंवा वैयक्तीक असो होणारे असेल तरच शब्द देतात.
आणि शब्दाला जागणारा हा नेता आहे.
(संकलन : गणेश जगदाळे/पारनेर)
COMMENTS