घरामध्ये घुसून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील घटना एकूण ३७ जणांविरोधात गुन्हा दाखल पारनेर प्रतिनिधी :...
घरामध्ये घुसून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील घटना
एकूण ३७ जणांविरोधात गुन्हा दाखल
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र दिल्याच्या रागातून चार जणांना घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी गावातील ३७ जणांविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रमेश रामदास वाघ (वय ३३, रा. कर्जुले हर्या) हे व त्यांची पत्नी घरासमोर बसलेले होते. वाघ यांच्या पत्नीने गावात दारूबंदी करण्याबाबत ग्रामपंचायतीला पत्र दिल्याच्या रागातून संजय गावडे, रोहिदास बड़े, मिथुन पवार, राजेंद्र वाघ यांनी रमेश वाघ यांना मारहाण केली. वस्तीवरील लोक त्यांच्या मदतीला आल्याने विशाल वाघ, अजय घोलवड, तुषार वाघ, सूरज वाघ, विकास पवार, करण पवार यांच्यासह ३७ जणांच्या टोळक्याने दंगा करून लहू वाघ, अर्जुन वाघ, सतीश माळी,
सुनील माळी या भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या लोकांना लाकडी दांडके व दगडफेक करून जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, घरासमोरील दुचाकी व पाण्याच्या ड्रमचे नुकसान केले. घरात घुसून नासधूस केली. या प्रकरणी रमेश वाघ यांच्या फिर्यादीवरून ३७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS