भोयरे गांगर्डात चोरी, डोक्यात घातला दगड वारंवार घरफोडीसह मारहाणीच्या घटना पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथे वारंवार...
भोयरे गांगर्डात चोरी, डोक्यात घातला दगड
वारंवार घरफोडीसह मारहाणीच्या घटना
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथे वारंवार घरफोडीसह मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. पोलीसांकडून याचा अद्याप तपास लागला गुरूवारी मध्यरात्री दोन वाजता अमृत काकासाहेब पवार यांच्या घरी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. यात बाहेर झोपलेले अमृत पवार यांच्या डोक्यात दगड डोक्यात घा लून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.
अमृत पवार गुरुवारी सायंकाळी ९ वाजता जेवण करून घराबाहेर पडवीत झोप- ले असताना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अंदाजे चार ते पाच चोरट्यांनी घराला वेढा घातला. चोरट्यांनी बाहेर झोपलेले अमृत पवार यांच्या डोक्यात दगड घातला. बाहेर कशाचा आवाज आला म्हणून त्यांच्या पत्नीने घरा- चा दरवाजा उघडला असता चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केली असता त्यातील दोघांनी त्यांच्या डोक्यात काठीने बेदम मारहाण करत चोरट्यांनी घरातील व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान ग्रामस्थांनी घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने सुपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या संदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक पवार यांनी बाजीराव गांगड यांना घटनेची कल्पना दिली. गांगडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक पवार, उपसरपंच सुधीर पवार, बाळासाहेब सातपुते, दिलीप पवार, सुरेश पवार, सुरेश साबळे आदींच्या मदतीने अमृत पवार यांना प्राथमिक उपचारासाठी सुपा येथे हलविण्यात आले. प्रकृती चितांजनक असल्याने त्यांना नगरच्या खा- सगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
घटनेचा तपास न लागल्यास तीव्र आंदोलन
अमृत पवार हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांची घराची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. पवार यांचे कुणाशी वैर नव्हते. यातील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच अनिता भाऊसाहेब भोगाडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
COMMENTS