स्व. सुभाष किसन गुंड यांचे १९ वे पुण्यस्मरण. पुण्यस्मरणानिमित्त वडगाव दर्या येथे प्रवचन सेवा पारनेर/प्रतिनिधी : स्व. सुभाष किसन गुंड यांचा ...
स्व. सुभाष किसन गुंड यांचे १९ वे पुण्यस्मरण.
पुण्यस्मरणानिमित्त वडगाव दर्या येथे प्रवचन सेवा
पारनेर/प्रतिनिधी :
स्व. सुभाष किसन गुंड यांचा पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथे सर्व सामान्य गुंड कुटुंबात जन्म झाल्यानंतर आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबई या ठिकाणी जाऊन वाहन चालक म्हणून ते काम करत होते. कमी वयातच म्हणजे दिनांक १६ मार्च २००३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचा १९ वा पुण्यस्मरण कार्यक्रम दिनांक १८ मार्च २०२३ रोजी वडगाव दर्या येथे त्यांच्या राहत्या घरी होत आहे.
स्व. सुभाष किसन गुंड यांना जाऊन १९ वर्ष झाले. त्यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
स्वर्गीय सुभाष किसन गुंड यांच्या पाठीमागे गं.भा. सुशाबाई सुभाष गुंड (पत्नी) श्री. राहुल सुभाष गुंड (मुलगा)श्री. संभाजी सुभाष गुंड (मुलगा) सौ.शैला सुरेश दाते (मुलगी) सौ. विजया अशोक वराळ (मुलगी) सौ. हौसाबाई बाळकृष्ण खोसे (बहीण) श्री. सतिष घोंडीभाऊ गुंड (पुतण्या) सौ. भामाबाई लिंबाजी झंजाड ( बहीण) श्री. अनिल धोंडीभाऊ गुंड (पुतण्या) कु.गौरव संदिप गुंड (नातू) श्री. बाळासाहेब किसन गुंड (भाऊ) श्री. मुरलीधर शिवराम गुंड (भाऊ) श्री. शंकर शिवराम गुंड (भाऊ) कु. ऋषिकेश बाळासाहेब गुंड (पुतण्या) कु. तेजस बाळासाहेब गुंड (पुतण्या)
असा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे.
दरम्यान एकोणिसाव्या पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प अक्षय महाराज उगले (जेऊर हैबती) यांचे सकाळी १० ते १२ प्रवचन होणार आहे. प्रवचनानंतर महाप्रसादाचे आयोजन गुंड परिवाराच्या वतीने करण्यात आले आह. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गुंड परिवार व नातेवाईक तसेच समस्त ग्रामस्थ वडगाव दर्या यांनी केले आहे.