आमदार निलेश लंके म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला समाज कार्यासाठी पाठबळ देणारा नेता ... माझे आणि आमदार निलेश लंके यांचे तस पाहिले तर कौटुंबिक न...
आमदार निलेश लंके म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला समाज कार्यासाठी पाठबळ देणारा नेता ...
माझे आणि आमदार निलेश लंके यांचे तस पाहिले तर कौटुंबिक नातेसंबंध परंतु त्यांच्या सोबत जोडला गेले पासून आज पर्यन्त याची जाणीव होऊ न देता मोठा भाऊ म्हणून नेहमी पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे नेतृत्व म्हणजे लोकनेते
मला समाज कार्याची प्रचंड आवड आणि या आवडीला गेली. सात आठ वर्षे नेत्यानी प्रचंड ताकत देऊन पाठबळ देण्याचा प्रयत्न केला.
विधानसभा निवडणुकी अगोदर पासून नेत्यान सोबत संघटनेत काम करत असल्याने नेत्यानी निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई विभागाच्या प्रसार माध्यमची जबाबदारी दिली आणि ती यशस्वी पणे पार पाडली. कालांतराने आमदार साहेबांचा विश्वासू सहकारी म्हणून गावातील जनतेने पत्नी च्या रूपाने बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड केली. आणि गावातील जनतेची सेवा आणि गावचा विकास करण्याची संधी मिळाली ती सुद्धा आमदार निलेश लंके साहेबान मुळेच
आमदार साहेबान कडून आज पर्यंत रांधुबाई मंदिर सभामंडप, मुस्लिम समाज्याच्या मजीद सुशोभीकरणा साठी निधी उपलब्द करून देण्यात आला असून तलाव दुरुस्ती साठी सुद्धा तब्बल 37 लक्ष रुपयांची तरतूद आमदार साहेबांनी करून दिली आहे. यापुढे ही मुक्ताईनगर सिंगल फेज जोडणी मुस्लिम समाज्यास शादिखाना वाडी वस्त्यांना जोडणारे रस्ते हायमॅक्स तलाव दुरुस्ती या कामाची शासन दरबारी आमदार साहेबांनी आमच्या मागणी वर शासन दरबारी प्रस्थाव सादर केले असून या कामानाही येत्या काळात मंजुरी मिळवून देण्यात आमदार साहेब प्रयत्नशील आहेत.
कोरोना काळात केलेलं काम तर आमदार साहेबाच्या सामाजिक जाणिवेचा सर्वोच्च भाग असल्याचे माझे मत आहे. आमदार साहेबान सोबत 8 ते 9 वर्षा पासून असल्यामुळे सामान्य जनते प्रति आमदार साहेब कीती भावुक असतात ते आम्ही जवळून पाहिले आहे. स्वतःच्या पोटाची काळजी न करता भुकेल्या व्यक्तीला आपला स्वतःचा घरून आणलेला डबा देताना आम्ही स्वता डोळ्याने पाहिलं आहे.
समाज्याच्या प्रत्येक तरुण वयस्कर महिला, युवती, विद्यार्थी अथवा बालके घटका कडून आमदार साहेबांच्या निस्वार्थी कार्याला नेहमी शुभेच्छा असतात आणि आमदार साहेब सुद्धा या लोकांच्या प्रत्येक सुख दुःखात जातिनिशी लक्ष घालतात
आज आमदार साहेबांचा अर्थात आमच्या दैवताचा वाढदिवस माझ्या निरुपयोगी आयुष्यातील काही वर्षे माझ्या या नेतृत्वाला मिळो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा अशीच निरंतन सुरू राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
प्रविण साबळे
आमदार निलेश लंके प्रतिष्ठान
प्रसार माध्यम प्रमुख मुंबई
COMMENTS