तालुक्यातील टँकर घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने टँकरची याचिका निकाली साईसहारा संस्थेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल पोलिस यंत्रणेकडून तप...
तालुक्यातील टँकर घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने टँकरची याचिका निकाली
साईसहारा संस्थेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
पोलिस यंत्रणेकडून तपास सुरु
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील टँकर घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने लोकजागृती सामाजिक संस्थेची याचिका न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे यांच्या खंडपीठाने बुधवारी निकाली काढली.
पारनेर तालुक्यातील टैंकर घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने सदर घोटाळ्याची चौकशी करून न्यायालयाला अहवाल सादर केला होता. न्यायालयाने पोलिसांनाही
या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. परंतु पोलिसांनी टँकर घोटाळा झालाच नसल्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला होता.
पोलीस व चौकशी समितीच्या
अहवालात प्रचंड तफावत आढळून आली होती. न्यायालयाने चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंत्यांनी घोटाळेबाज साईसहारा संस्थेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संस्थेच्या वतीने वकील चैतन्य धारूरकर यांनी बाजू मांडली.
संस्थेचे १५ हजार रुपये घाटी रुग्णालयाला
लोक जागृती सामाजिक संस्थेला याचिका दाखल करतेवेळी ५० हजार रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले होते. याचिकाकर्ता सामाजिक संस्था यांची मागणी न्यायालयात मान्य झाल्यामुळे संस्थेने सामाजिक उपक्रमांसाठी देणगी देण्याची सरकारी पक्षाने न्यायालयाकडे केली. त्यावर न्यायालयाने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) यांना देण्याचे व उर्वरित पस्तीस हजार रुपये लोकजागृती सामाजिक संस्था यांना परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
COMMENTS