परमेश्वर भक्तीततच जीवनाचे खरे सार -हभप . बुचुडे पारनेर / प्रतिनिधी ( संजय मोरे ) समाजात जीवन जगताना माणसाच्या ह्रदयात दया क्षमा शांती आणि थ...
परमेश्वर भक्तीततच जीवनाचे खरे सार -हभप . बुचुडे
पारनेर / प्रतिनिधी ( संजय मोरे )
समाजात जीवन जगताना माणसाच्या ह्रदयात दया क्षमा शांती आणि थोडीसी परमेश्वर भक्ती असावी परमेश्वर भक्तीतच खरे जीवनाचे सार आहे असे प्रतिपादन हभप गोकुळ महाराज बुचुडे यानी केले .
पारनेर तालुक्यातील पारनेर कान्हूर पारनेर रोड वरील गणपती चौफुला (विरोली ) येथील गणपती गणपती मंदिरात आयोजित केलेल्या ३३ व्या अखंड हरिनाम सप्ताह किर्तन मालेतील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते .
हभप हेमंत महाराज घोडके यानी सुंदर मृदंगाची साथ दिली पंचक्रोशीतील भावीकांनी मोठी गर्दी केली होती .
हभप बुचुडे म्हणाले की जीवनात ब्रम्ह ज्ञान मिळवायच असेल तर गुरू चरणी लीन व्हावे लागते त्या साठी गुरू महत्त्वाचा आहे त्यासाठी अंतःकरणात भक्तीचा ओलावा असल्याशिवाय ब्रम्ह ज्ञान मिळत नाही .
आज धर्म मोडकळीस आला त्याचा कारण साधु हेच संधी साधू झाल्यामुळेच धर्माला ग्लानी येत आहे .
जीवन कोणतेही काम करा पण अंतःकरण शुद्ध ठेवुन करा जीवनात कधीही अपयश येत नाही . जीवनात श्रद्धा जरूर ठेवा पण अंधश्रध्दा नको असा संदेश ही उपस्थिताना गोकुळ महाराज बुचुडे यानी उपस्थिताना दिला .जीवनात मद मोह मत्सर याना स्थान न देता निष्कलंक जीवन जगण्याचा प्रयत्न करा समाज सुखी समाधानी होईल असेही समारोप प्रसंगी सांगितले
COMMENTS