कलियुगात परमार्थ भक्तीची गरज : ह.भ.प. शिंदे पारनेर/प्रतिनिधी (संजय मोरे) : कलियुगातील वास्तवता अत्यंत भयानक असून आत्ताच्या काळामध्ये परमेश...
कलियुगात परमार्थ भक्तीची गरज : ह.भ.प. शिंदे
पारनेर/प्रतिनिधी (संजय मोरे) :
कलियुगातील वास्तवता अत्यंत भयानक असून आत्ताच्या काळामध्ये परमेश्वराचे चिंतन करणे हे गरजेचे असून परमेश्वरावर श्रद्धा ठेवून जीवन मार्गक्रमण करावे म्हणजेच कलियुगात परमार्थ अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन शिंदेवाडी तालुका जुन्नर येथील लहू महाराज शिंदे यांनी केले.
पारनेर तालुक्यातील पारनेर कानूर पठार रोडवरील गणपती चौफुला येथील गणपती मंदिरात आयोजित केलेल्या तिसाव्या अखंड हरिनाम सप्ताहाचे किर्तन मालेतील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते या वेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते वैकुंठ वाशी सद्गुरु हरिभक्त परायण नाना महाराज वनकुटे कर यांच्या प्रेरणेतून तेहतीस वर्षांपूर्वी या अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला लहू महाराज शिंदे पुढे बोलताना म्हणाले वैकुंठवासी हरिभक्त परायण नाना महाराज यांच्या प्रेरणेने कलियुगातही अत्यंत चांगल्या प्रकारचा परमार्थाची पेरणी केली त्यामुळे अध्यात्म टिकून आहे माणसाने जीवन जगताना परमेश्वर भक्तिच्या आनंदाबरोबरच समाजप्रबोधनाच्या कामातही योगदान देणे गरजेचे आहे मात्र मात्र कलियुगातील परमेश्वर भक्ती डिजिटल झाले आहे.
यासाठी प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृती चांगले काम करता येते आई-वडील आणि परमेश्वर यांची सेवा केल्याने समाधान मिळतील परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने कोरोनाच्या भयानक महामारी मध्ये आपण सुरक्षित आहोत. डॉक्टर आणि परमेश्वराची कृपा आहे विरोली तालुका पारनेर येथील गणपती मंदिर सप्ताह तालुक्यातील एक नाव लोकगीत ज्ञानदान करणारा असल्याचे गौरवोद्गार लहु महाराज शिंदे यांनी काढले तुमच्या रोजच्या जीवनातील तुमच्या कर्मावर तुमचं हित आणि अहित अवलंबून आहे.