नारायण गव्हाण येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्वसंरक्षण कार्यशाळा महिला निर्भय झाल्या तरच देशाचा विकास : राजेश्वरी कोठावळे पारनेर प्रतिनिधी :...
नारायण गव्हाण येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्वसंरक्षण कार्यशाळा
महिला निर्भय झाल्या तरच देशाचा विकास : राजेश्वरी कोठावळे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथे जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा पारनेरची संघर्ष कन्या आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच राजेश्वरीताई कोठावळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालय, नारायण गव्हाण येथे मुलींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा घेतली यामध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे त्यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली व मार्गदर्शन केले हा सामाजिक उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आला.
यावेळी राजेश्वरी कोठावळे बोलताना म्हणाल्या की आज महिलांनी कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे, म्हणुन महिला या निर्भय झाल्या तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास साध्य होईल. शासनाने महिला सुरक्षेच्या दृष्टीने विविध कायदे केले आहेत. आज महिलांचे आर्थिक दृष्ट्या सबलीकरण होण्याचे प्रमाण व वेग कमी आहे. म्हणून ही शक्ती समृद्ध व सशक्त बनविणे समाजाची जबाबदारी आहे. आज आपण मुलींना विविध स्वरक्षणासाठी कौशल्य शिकविणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या तसेच यावेळी कोठावळे यांनी दैनंदिन जीवनात कार्यक्षमता वाढविण्यासाठी कराटे प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रम प्रसंगी नारायण गव्हाण च्या आदर्श सरपंच मनीषा जाधव बोलताना म्हणाल्या की माझ्या सहकारी राजेश्वरी कोठावळे यांनी मुलींसाठी व महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा घेत समाजामध्ये एक चांगला उपक्रम त्या राबवत आहेत त्या माध्यमातून आज मुलींना व महिलांना खऱ्या अर्थाने स्वसंरक्षण विषयक मार्गदर्शन मिळत असून त्यामुळे राजेश्वरी ताई कोठावळे यांचे कार्य समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच मनीषा जाधव उपसरपंच राजेश शेळके माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक व माजी सरपंच सुमन शेळके मॅडम मुख्याध्यापक साठे सर,ग्रामपंचायत सदस्य सूरज खरात, माजी सरपंच विलासराव खोले, ग्रामपंचायत सदस्य शायदा शेख, ग्रामपंचायत सदस्य विशाल कांडेकर, दत्तात्रय नाईक, पांडुरंग शेळके, मेजर तानाजी पवळे, मेजर रामदास जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS