प्रगत विद्यालय वनकुटे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील प्रगत विद्यालय वनकुटे येथील इ...
प्रगत विद्यालय वनकुटे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील प्रगत विद्यालय वनकुटे येथील इ १०वीच्या विद्यार्थ्यांना एस एस सी बोर्ड परिक्षेसाठी शुभेच्छा, तसेच निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्खाध्यापक श्री पवार सर होते.
यावेळी इ १०वीच्या विद्यार्थ्यांतर्फे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच फुल न फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे इ १०वीच्या विद्यार्थ्यांतर्फे विद्यालयास ब्लँक बोर्ड भेट देण्यात आला.
इ ५वी ते इ ९वीच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तद्नंतर श्री औटी सर, ऋषिकेश गागरे सर, गोरक्ष गागरे सर, झावरे सर, दिवटे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या ठिकाणी इ १०वीच्या विद्यार्थ्यांनी ६वर्षे या ठिकाणी ज्ञान मिळवले. त्याच ज्ञानाच्या आधारेच तुमच्या भावी आयुष्याची वाटचाल करणार आहात. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर आपण कोणतेही संकट सहजपणे पार करुन यशप्राप्ती करु शकतो. आपण कितीही उच्च पदावर जरी कार्यरत झाले तरी ज्या शाळेनी ज्या मातीने आपल्याला घडविले त्या शाळेला मातीला विसरता काम नये. अशा प्रकारे कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय म्हणुन श्री पवार सर यांनी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष मा.सुजित झावरे पाटील व संस्थेचे सचिव सुदेशभैय्या झावरे पाटील यांच्यावतीने इ १०वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गागरे सर यांनी केले. व आभार श्री व्यवहारे सर यांनी मानले.