--> "पोदार इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर मध्ये भरले छोट्या वैज्ञानिकांचे प्रदर्शन" | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

"पोदार इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर मध्ये भरले छोट्या वैज्ञानिकांचे प्रदर्शन"

वेब टीम : अहमदनगर  पोदार इंटरनॅशल स्कूल मध्ये आज विज्ञान दिन साजरा करताना विज्ञान प्रदर्शन व विज्ञान या विषयावर प्रश्नमंजूषा घेण्यात आली. वि...

वेब टीम : अहमदनगर 

पोदार इंटरनॅशल स्कूल मध्ये आज विज्ञान दिन साजरा करताना विज्ञान प्रदर्शन व विज्ञान या विषयावर प्रश्नमंजूषा घेण्यात आली. विज्ञान प्रदर्शनात अगदी इ. १ली पासून ते इ. ९वी पर्यँतच्या विद्यार्थ्यांनी  भाग घेतला होता. जवळ जवळ २०० विद्यार्थ्यांनी यात आपली उपकरने तयार करून त्यांची माहिती इतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिली. या साठी शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ. नलिनी काटरपवार, सौ. डायना सत्राळकर, सौ. पूनम जाधव, सौ. शुभांगी यादव आणि कु. दृष्टी अलरेजा यांनी विद्यार्थ्यांना उपकरणे तयार करण्यासाठी व निवडीसाठी विशेष मार्गदर्शन केले. 

त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची उपकरणे या प्रदर्शनात तयार केली होती. याप्रसंगी विदयार्थ्याना मार्गदर्शन करताना शाळेचे प्राचार्य मा. श्री. मंगेश जगताप यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की अनेक नवनवीन प्रयोग करून पाहा. विज्ञानाची कास धरा त्यातून तूमची प्रगती तर होईलच, त्याबरोबर भविष्यातील नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरणा मिळेल. तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठीच हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले. 


तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला अगदी इ.१ली व २री च्या विद्यार्थ्यांनी पण मोठ्या संख्येने यात भाग घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. गेली दोन वर्षे शाळेत विज्ञान प्रदर्शन झाले नव्हते ,त्यामुळे अगदी पहिली पासून ते नववी पर्यँतच्या सर्व विद्यार्थ्याशी संवाद साधत त्यांना याप्रसंगी    त्यांनी शाबासकी दिली, कौतुक केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. डायना सत्राळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन  श्री. सुरेश शेळके यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: "पोदार इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर मध्ये भरले छोट्या वैज्ञानिकांचे प्रदर्शन"
"पोदार इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर मध्ये भरले छोट्या वैज्ञानिकांचे प्रदर्शन"
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEivWTs4PbPMmMZ3SX9v7hcI0dCophXWMU2ACpRoS4PsrmlMPcDg9tx5SSl7lBXEJcED6GK2460fNX7sKoGozjo0Y6Xu3LeLt_S4pTlUeREcjwa8Nef6srl3-71l292m5b1UCHQHzeT3izFGoXoS_9YodYxJV-4gr_vXXlVG7KJsLPIGyaHNvtpXca_1=w640-h360
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEivWTs4PbPMmMZ3SX9v7hcI0dCophXWMU2ACpRoS4PsrmlMPcDg9tx5SSl7lBXEJcED6GK2460fNX7sKoGozjo0Y6Xu3LeLt_S4pTlUeREcjwa8Nef6srl3-71l292m5b1UCHQHzeT3izFGoXoS_9YodYxJV-4gr_vXXlVG7KJsLPIGyaHNvtpXca_1=s72-w640-c-h360
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/03/podar.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/03/podar.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content