सोसायटीच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे कितपत योग्य : सुजित झावरे पाटील तिखोल मध्ये सेवा सोसायटीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव सुजीत झा...
सोसायटीच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे कितपत योग्य : सुजित झावरे पाटील
तिखोल मध्ये सेवा सोसायटीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव
सुजीत झावरे पाटील गटाकडे सोसायटीची सत्ता
पारनेर प्रतिनिधी :
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून काम करणाऱ्या संस्थांच्या निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे उचित नसून असे होत असेल तर स्थानिक पातळीवर वाद निर्माण होतात स्थानिक पातळीवर सहकार क्षेत्र टिकला पाहिजे सहकार क्षेत्राला बळकटी मिळाली पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही सर्वजण काम करत आहोत तिखोल सेवा सोसायटी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे, मा. चेअरमन सुभाषशेठ ठाणगे मा. सरपंच सुभाष ठाणगे, मा. उपसरपंच नबा ठाणगे, मा. सरपंच नबाजी मंचरे मा चेअरमन नागचंद ठाणगे, मा. चेअरमन शिवाजीराव ठाणगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिखोल सेवा सोसायटीची निवडणूक एकतर्फी करून जो विजय मिळविला आहे तो खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकऱ्यांचा विजय असून सहकार क्षेत्राला हा विजय नक्कीच भविष्यात बळकटी देईल व त्यांच्या माध्यमातून या पुढील काळात शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सुटल्या जातील असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तिखोल विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली एकूण १३ जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना मित्र पक्षाच्या माध्यमातून जनसेवा पॅनलने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे, मा. उपसरपंच नबा ठाणगे, मा. चेअरमन सुभाष ठाणगे शिवाजीराव ग. ठाणगे, मा. सरपंच सुभाषशेठ ठाणगे मा. सरपंच नबाजी मंचरे, मा चेअरमन नागचंद ठाणगे, उद्योजक अशोक खराबी, शिवाजी धों. ठाणगे, भारत ठाणगे, जवाहरलाल ठाणगे, विष्णू बा. ठाणगे, लक्ष्मण शि. ठाणगे संतोष गु. ठाणगे, बाबुराव हिंगडे, भानुदास ठाणगे, भाऊसाहेब ना. ठाणगे, संभा ठाणगे, विठ्ठल ठाणगे, यांच्या नेतृत्वाखाली या एकतर्फी विजय मिळवत सोसायटी वर असलेली सत्ता राखली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित मुक्ताई माता ग्रामविकास पॅनलचा दारूण पराभव करत ही निवडणूक जिंकली आहे.
या निवडणुकीत सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी कावरे सुभाष रंगनाथ, ठाणगे ठकसेन तुळशीराम, ठाणगे नबा यशवंत, ठाणगे बाळू भाऊ, ठाणगे भाऊसाहेब यशवंत, ठाणगे राघू केसु, ठाणगे संदीपकुमार बबन, ठाणगे हौसाबाई शिवाजी, हे विजयी झाले असून अनुसूचित जाती जमातीतून साळवे उत्तम विनायक, इतर मागासवर्गीय मधून ठाणगे अरुण रामभाऊ महिला प्रतिनिधी ठाणगे रेश्मा बाळासाहेब, ठाणगे सविता जालिंदर, विमुक्त जाती /भटक्या जमाती राखीव प्रतिनिधी मंचरे अश्विन दशरथ हे सर्व विजयी झाले. सुजीत झावरे पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तरच सत्कार केला असून सेवा सोसायटी ताब्यात आल्यामुळे शेतकरी कष्टकरी समाजाला सोसायटीच्या माध्यमातून सहकार्य होणार असून सहकार क्षेत्राला बळकटी मिळणार आहे.
तिखोल गावातील ग्रामस्थ व सोसायटीचे सर्व सभासद मतदार यांच्या सहकार्यामुळे ही सेवा सोसायटीची निवडणूक आम्ही एकतर्फी विजयी झालो. विजयी सर्व उमेदवार हे २०० ते २५० च्या फरकाने विजयी झाले. सोसायटीच्या या निवडणुकीतील विजयामुळे यापुढील काळात तिखोल परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी विशेष लक्ष यापुढील काळात ही देणार आहे सुजीत झावरे पाटील यांच्या माध्यमातून तिखोल गावच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.
अरुणराव ठाणगे (मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर)
COMMENTS