काकणेवाडी येथे आधार लिंक कॅम्पचे आयोजन पारनेर प्रतिनिधी : काकणेवाडी येथे शंभुराजे मित्र मंडळ आणि लक्ष्मी आई वाचनालय तर्फे आधार मोबाईल लिंक श...
काकणेवाडी येथे आधार लिंक कॅम्पचे आयोजन
पारनेर प्रतिनिधी :
काकणेवाडी येथे शंभुराजे मित्र मंडळ आणि लक्ष्मी आई वाचनालय तर्फे आधार मोबाईल लिंक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळ पास 104 नागरिकांनी लाभ घेतला असल्याची माहिती युवा नेते आणि मंडळाचे अध्यक्ष योगेश पा. वाळुंज यांनी दिली.
कोणत्याही शासकीय योजनेसाठी आधार कार्ड ला मोबाईल लिंक असणे काळाची गरज आहे. विशेषत: pm किसान सन्मान निधी योजनेच्या e-kyc योजनेसाठी खूपच आवश्यक आहे. अनेक जेष्ठ नागरिक आणि महिलाना शिबीर लाभदायक ठरल्याचे मत मळगंगा माध्यमिक विद्यालय करंदीचे मुख्यध्यापक आणि वाचनालायाचे गुलबराव वाळुंज सर यांनी सांगितले.
शिबीरासाठी राजू ठुबे (पोस्ट मास्तर)यांचे सहकार्य लाभले. शिबीर यशस्वी होण्यासाठी इंजि अशोक वाळुंज,राजेंद्र झावरे (वि का सो सं
चालक)रभाजी वाळुंज, पत्रकार बाळा ठुबे, प्रवीण वाळुंज संभाजी पो.वाळुंज अंकुश वाळुंज अनिकेत वाळुंज किशोर वाळुंज , चिमाजी वाळुंज विष्णू वाळुंज राहुल वाळुंज.यांचे अनमोल सहकार्य लाभले.
चालक)रभाजी वाळुंज, पत्रकार बाळा ठुबे, प्रवीण वाळुंज संभाजी पो.वाळुंज अंकुश वाळुंज अनिकेत वाळुंज किशोर वाळुंज , चिमाजी वाळुंज विष्णू वाळुंज राहुल वाळुंज.यांचे अनमोल सहकार्य लाभले.
भविष्यात समाज हिताचे उपक्रम राबविण्यास शंभूराजे मित्र मंडळ आणि वाचनालय बांधील असल्याची ग्वाही ग्रामनेते भगवान शेठ वाळुंज यांनी दिली.
शिबिरात सहभागी झालेल्या ग्रामस्थाचे आणि योगदान देणाऱ्या सामाजिक संस्था चे आभार हभप रंगनाथ महाराज वाळुंज यांनी मानले.
COMMENTS