गुणवंत विद्यार्थ्यांचा जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने गुणगौरव गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार : संतोष चौगुले पारनेर/प्रतिनिध...
गुणवंत विद्यार्थ्यांचा जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने गुणगौरव
गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार : संतोष चौगुले
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील सावरगाव येथील जाणता राजा प्रतिष्ठान काळेवाडीच्या वतीने गावातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गावातील ग्रामदैवत श्री. बुवा महाराज यात्रा उत्सवाचे औचित्य साधत करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ व २०२२ या वर्षातील व या पुढील काळातील प्रत्येक शैक्षणिक वर्षात ७०% व त्या पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी गुणगौरव करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल तांबोळी यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी सावरगाव येथील दहावी व बारावीचे 70 पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी व पालक उपस्थित होते श्री. बुवा महाराज यात्रा उत्सवानिमित्त जाणता राजा प्रतिष्ठाणने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान हा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणा देणारा आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवा साठी बक्षीस सौजन्य देवरामशेठ मगर संतोष चौगुले रामदास दाते बाबाजीशेठ राळे, सुभाषशेठ राळे, गणेशशेठ पु.भोसले, सुनिलशेठ तांबोळी अक्षय गायखे यांनी मदत केली.
यावेळी जाणता राजा प्रतिष्ठानचे खजिनदार उद्योजक संतोषशेठ चौगुले, देवरामशेठ मगर(संचालक विविध का.का.सो सावरगाव) प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अजय बेलकर, सागर तांबोळी, सचिन घुले, किशोर बेलकर, ज्ञानेश्वर तांबोळी, सुभाष राळे, बाबाजी राळे, भगवंता भोसले, म्हतारबा गायखे, अनिल तांबोळी, रामदास दाते, नितिन बेलकर, अक्षय गायखे, सचिन गायखे, सुदर्शन बेलकर, विक्रम भोसले, हरी आंद्रे, अक्षय कळमकर,
दिनेश गायखे, आकाश गुगळे, सुरज मगर, कैलास गायखे, तुषार गायखे, पप्पू गायखे, अंकित गायखे, बाळासाहेब गायखे, साहेबराव राळे, मच्छिंद्र राळे, शांताराम राळे, अनिकेत गायखे, राहुल गायखे, ओंकार गायखे, संभाजी गायखे, प्रदिप चौधरी, उद्धव चौधरी, प्रकाश कळमकर, तुषार कळमकर, गंगाराम गायखे, नवनाथ गोडसे, सुभाष भोसले, रोहीत गोडसे, स्वप्निल लांडगे, भिमा गोडसे, प्रदिप गोडसे, शांताराम राळे, मछ्चिंद्र राळे, विशाल गायखे, संतोष भोसले, नामदेव चौधरी, दिपक गायखे, पप्पू लांडगे, शेखर दाते, रोहिदास डोंगरे, रमेश कळमकर,
श्री. नामदेव ग्रुप, नम्रता प्रॉपर्टी पनवेल, जाणता राजा प्रतिष्ठान काळेवाडी,समस्थ ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ काळेवाडी सावरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
सावरगाव व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सर्वजण जाणता राजा प्रतिष्ठान च्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आम्ही यापुढील काळात शैक्षणिक मदत करणार आहोत त्या माध्यमातून यापुढे आमचा काम करण्याचा मानस आहे.
संतोष चौगुले
(उद्योजक, मुंबई खजिनदार जाणता राजा प्रतिष्ठान)
COMMENTS