वयोश्री योजनेचे पारनेर येथे साहित्य वाटप खा. विखे यांनी शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवली : किरण कोकाटे पारनेर/प्रतिनिधी : नगर दक्षिण चे ...
वयोश्री योजनेचे पारनेर येथे साहित्य वाटप
खा. विखे यांनी शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवली : किरण कोकाटे
पारनेर/प्रतिनिधी :
नगर दक्षिण चे खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून केंद्र सरकारची राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ पारनेर तालुक्यातील अनेक दिव्यांग व्यक्तींना देण्यात आला तालुक्यात वयोश्री योजनेच्या माध्यमातून ठीक ठिकाणी शिबिर घेत सर्वसामान्य व्यक्तीला या योजनेचा लाभ विखे यांनी मिळवून दिला आहे सर्वसामान्य व्यक्तीला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचेही विशेष सहकार्य खासदार सुजय दादा विखे यांना मिळाले दि. १५ रोजी पारनेर शहरातील दिव्यांग वृद्ध बांधवांना राष्ट्रीय वयोश्री योजनेतील साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी दिव्यांग वृद्ध अपंग बांधवांना वयोश्री योजनेचे साहित्य वाटप करताना राहुल विखे पा, राहुल शिंदे, नगरसेवक युवराज पठारे, भाजप शहर प्रमुख किरण कोकाटे, व आदी मान्यवर या योजनेचा लाभ पारनेर तालुक्यातील अनेक व्यक्तींना देण्यात आला आहे. यावेळी बोलताना राहुल शिंदे पाटील म्हणाले की खासदार सुजय दादा विखे यांनी आपल्या तालुक्यात राष्ट्रीय वयोश्री योजना राबवून सर्वसामान्य जनतेला एक प्रकारे आधार देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अनेक लोकांना चांगला लाभ झाला असून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोचली पाहिजे ही भूमिका ठेवून खासदार सुजय दादा विखे ही काम करत आहेत.
खासदार सुजय दादा विखे यांनी केंद्रशासनाची असलेली राष्ट्रीय वयोश्री योजना नगर दक्षिण मध्ये सर्वात प्रभावीपणे राबवली असून याचा लाभ सर्वसामान्य जनतेला झाला आहे शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या पाहिजे ही भूमिका घेऊन खासदार सुजय दादा विखे ही नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात काम करत आहेत.
किरण कोकाटे
(शहराध्यक्ष : भारतीय जनता पार्टी पारनेर)