वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शालेय साहित्य वाटप वासुंदे येथील साळुंके परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी पारनेर/प्रतिनिधी : ज्येष्ठ सामाज...
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शालेय साहित्य वाटप
वासुंदे येथील साळुंके परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी
पारनेर/प्रतिनिधी :
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंके गुरुजी, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका सुमन साळुंके यांचे नातू व युवा नेते दत्तात्रय उर्फ बापूसाहेब साळुंके यांचे चिरंजीव विराज याचा सहावा वाढदिवस वासुंदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले हा एक आदर्श उपक्रम असून असा उपक्रम राबवून साळुंके परिवाराने एक सामाजिक आदर्श जपला आहे चि. विराज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे पाटील, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल उगले, शाश्वत शैक्षणिक संस्थेचे किरण झावरे, संतोष झावरे, स्वप्नील झावरे, सुदाम शिर्के, दत्ता साळुंके, कचरू दाते, उत्तम वाबळे, सुभाष हिंगडे, नानाभाऊ उगले, भास्कर झावरे, धोंडिभाऊ चेमटे सर, रावसाहेब बर्वे, डॉ. बाबासाहेब गांगड, अमोल उगले, प्रवीण साळुंके सुमित औटी सागर झावरे मेजर ठाकजी खराबी, शुभम सावंत, दादा भालके, वासुंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद भालेकर सर तसेच त्यांचे सर्व कर्मचारी वृंद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, बोलताना म्हणाले की साळुंके परिवारने चिरंजीव विराज याचा वाढदिवस शैक्षणिक साहित्याचे वाटप खाऊ वाटप करून साजरा करून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. वासुंदे परिसरामध्ये साळुंके परिवार नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतो. सामाजिक कामांमध्ये सहभागी असतो. वाढदिवस साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे.
COMMENTS