पारनेच्या तालुक्याच्या विकासासाठी कटीबद्ध : डाॅ.सुजय विखे पाटील राळेगण थेरपाळ येथील बैलगाडा शर्यती लक्षवेधी तालुक्यातील राळेगण थेरपाळ, नार...
पारनेच्या तालुक्याच्या विकासासाठी कटीबद्ध : डाॅ.सुजय विखे पाटील
राळेगण थेरपाळ येथील बैलगाडा शर्यती लक्षवेधी
तालुक्यातील राळेगण थेरपाळ, नारायणगव्हाण, निघोज येथे कार्यक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याला रस्ते, पुल, सभामंडप या कामांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. कोरोना काळात गाव भेटी विविध कार्यक्रमांना बंदी असल्याने नागरिकांच्या भेटींना प्रतिबंध होते. आता मात्र विविध निवेदन येत या कामांनाही निधी उपलब्ध करू पारनेर तालुक्याच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले.
पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील विचारमंच आयोजित बैलगाडा शर्यत उद्घाटन, नारायणगव्हाण येथील सेवा संस्थेस भेट, मावळेवाडी,निघोज येथे विविध कार्यक्रम प्रसंगी खासदार डाॅ.विखे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, सभापती गणेश शेळके, युवा नेते राहुल शिंदे पाटील, डाॅ.भाऊसाहेब खिलारी, सरपंच पंकज कारखिले, सचिन वराळ पाटील, किरण कोकाटे, कैलास कोठावळे, सरपंच मनोज मुंगसे,दादाभाऊ वारे, रविंद्र पाडळकर, उपस्थित होते. डाॅ.विखे म्हणाले,वयोश्री योजनेचा दिल्लीत गाजावाजा झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही योजना नगर जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबविल्याबद्दल कौतुक केले. एखादी योजना राबविण्यात येत असताना त्याचा गावातील सर्वांनी लाभ घेणे आवश्यक आसते. अजुनही केंद्रातील योजना गावोगाव राबविणार आहे.
नगरपंचायत मधील झालेला प्रकार निंदनीय - खासदार डाॅ. सुजय विखे
पारनेर हा शिक्षक आणि अधिकारी पुरविणारा सुसंस्कृत तालुका अशी ओळख राज्यभर आहे. मात्र पारनेर नगरपंचायत मध्ये अभियंत्यांला झालेली मारहाण त्या दरम्यान मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या महिला अधिका-याला देखील जुमानले नाही.हा झालेला प्रकार निंदनीय आहे.तालुका कोणत्या दिशेने चालला आहे. असा सवाल खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.