स्वामी समर्थ बँकेला पाच कोटी २४ लाखांचा नफा पारनेर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील सहकार अग्रगण्य असलेल्या श्री स्वामी क्षेत्रात समर्थ बँकेला चालू ...
स्वामी समर्थ बँकेला पाच कोटी २४ लाखांचा नफा
पारनेर/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील सहकार अग्रगण्य असलेल्या श्री स्वामी क्षेत्रात समर्थ बँकेला चालू आर्थिक वर्षामध्ये ५ कोटी २४ लाख रुपये नफा झाला आहे. त्यामधून २ कोटी ९६ लाखांच्या तरतुदी करून निव्वळ नफा २ कोटी २८ लाख रुपये झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अॅड. अशोकराव शेळके यांनी दिली.
"पत्रकारांशी बोलताना अॅड. शेळके म्हणाले, की चालू आर्थिक वर्षात ठेवींमध्ये १२ कोटींची वाढ झाली आहे. खेळत्या भांडवलात १५ कोटींची वाढ झाली आहे.
मुख्य कार्यालयासह ११ शाखांच्या माध्यमातून १९१ कोटी ४१ लाख रुपये ठेवीचा टप्पा गाठला आहे. ९९ कोटी ७१ लाख रुपये कर्ज वाटप केलेले आहे. बँकेचे खेळते भांडवल २२७ कोटी ८४ लाख असून गुंतवणूक ११३ कोटी ४४ लाख इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेचा सी. डी. रेशो ५२.१० टक्के व सी आर ए आर २३.८६ टक्के इतका आहे. बँकेकडील स्वनिधी २० कोटी ८४ लाख रुपये असून बँकेची नेट वर्थ २४ कोटी ९६ लाख रुपये आहे. कर्जाच्या वसुलीबाबत कोरोनाच्या कालावधीत सुद्धा बँकेने उत्कृष्ट कामगिरी करताना ढोबळ एन. पी. ए. चे प्रमाण १.१५ टक्के राखत निव्वळ एन. पी. ए. शून्य टक्के आहे. बँक लवकरच २०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणार आहे.
COMMENTS