नवनाथ रासकर यांची मनसेचा तालुका विभाग प्रमुख पदी निवड जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या हस्ते निवडीचे पत्र मनसे संघटना तालुक्यात वाढीसाठी प्रयत्...
नवनाथ रासकर यांची मनसेचा तालुका विभाग प्रमुख पदी निवड
जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या हस्ते निवडीचे पत्र
मनसे संघटना तालुक्यात वाढीसाठी प्रयत्न करणार : नवनाथ रासकर
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील जवळा येथील नवनाथ रासकर हे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विचारांना प्रभावित होऊन ते मनसे सोबत काम करत होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन अहमदनगर मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, पारनेर तालुका मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी नवनाथ रासकर यांची मनसेच्या तालुका विभाग प्रमुख पदी निवड करत त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
नवनाथ रासकर यांची तालुका विभाग प्रमुख पदी निवड झाल्यामुळे जवळा परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढणार आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरातून कौतुक होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका पदाधिकारी यांनी त्यांचा सन्मान करत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मनसे उपजिल्हाप्रमुख मारुती रोहोकले, पप्पू लामखडे, जिल्हा सचिव नितीन भुतारे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, महेंद्र गाडगे, चतुर महाराज, खोडदे मामा,
मनसे महिला आघाडी तालुकाध्यक्ष जयश्रीताई महांडुळे, तालुका सचिव गणेश तांबे, सहकार सेना जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के, पारनेर शहराध्यक्ष महेश चेडे, तालुका विभाग प्रमुख अमोल गायकवाड, शाखाध्यक्ष अक्षय पठारे व मनसैनिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी म्हणाले की नवनाथ रासकर सारख्या एका युवकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून जवळा परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटना निश्चितच नवनाथ रासकर हे बळकट करतील आणि मनसेला तालुका पातळीवर संघटनात्मक कामामध्ये ही ते चांगली मदत करतील. त्यांना यापुढील काळातील कामासाठी मी शुभेच्छा देतो.
माझ्यावर मनसे तालुका विभाग प्रमुख पदाचा जिल्हाध्यक्ष डफळ साहेबांनी जो विश्वास ठेवला आहे व एक जबाबदार पदावर काम करण्याची संधी दिली आहे. त्या संधीचे सोने करून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुक्यातील काम जिल्हा व राज्य पातळीवर नेण्याचा प्रयत्न करील. संघटनात्मक पातळीवर काम करून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करेल.
नवनाथ रासकर (नवनिर्वाचित मनसे तालुका विभाग प्रमुख, पारनेर)