पळशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप पारनेर/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ...
पळशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पारनेर/प्रतिनिधी :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पळशी येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. पळशी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्याचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशासाठी असलेले कार्य पटवून सांगितले. यावेळी युवा नेते अमोल साळवे बोलताना म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजासाठी प्रेरणास्रोत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना आपण सर्वांनी सामाजिक प्रेरणा ठेवून काम केले पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.
पळशी गावचे उपसरपंच आप्पासाहेब शिंदे, नंदु साळवे, विलास साळवे, प्रविण (गोट्याभाऊ) गागरे, संपत जाधव, गणेश शिंदे, भाऊसाहेब वारे, योगेश गागरे, विश्वजीत साळवे, निलेश साळवे, सिताराम साळवे, अविनाश साठे, संतोष साठे, बाबाजी सुडके, नितीन पाडळे, रामदास साळवे, नितीन साळवे, युवराज शिंदे, देवानंद साळवे, संदिप साळवे, तोफिक राजे, संकेत झावरे, गणेश जगदाळे आदी मान्यवर व पळशी येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी येथील शिक्षक कर्मचारी रुंद हे उपस्थित होते.
COMMENTS