वेब टीम : लखनऊ उत्तर प्रदेशातल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचं काम येत्या १७ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे, तसंच त्याबाबतचा तप...
वेब टीम : लखनऊ
उत्तर प्रदेशातल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचं काम येत्या १७ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे, तसंच त्याबाबतचा तपशिलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश वाराणशीतल्या न्यायालयानं दिले आहेत.
हे सर्वेक्षण करण्यासाठी नेमलेले एडव्होकेट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांना हटवण्याची अंजूमन इंतेजामिया मशिद समितीची याचिका न्यायालयानं फेटाळली.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ६ मे पासून ज्ञानवापी मशिदीच्या आवारात सर्वेक्षणाचं काम सुरु झालं. मात्र दुसऱ्या दिवशी हे काम थांबवलं आणि मिश्रा यांना बदलण्यासाठी अंजूमन इंतेजामिया मशिद समितीनं याचिका दाखल केली.
या याचिकेच्या विरोधात दुसरी एक याचिका दुसऱ्या दिवशी न्यायालयात दाखल झाली.
मशिदीच्या तळघरासमोर संपूर्ण आवाराचं ध्वनिचित्र मुद्रण पूर्ण करण्याचा आदेश काढावा अशी मागणी या याचिकेत केली होती.
ज्ञानवापी मशिद आणि श्रृंगार गौरी मंदिराच्या आवारात दररोज पूजा आणि धार्मिक विधी करायला परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका एक वर्षापूर्वी दाखल झाली होती. त्या अनुषंगानं हे प्रकरण पुन्हा चालू आहे.