निधन वार्ता टाकळी ढोकेश्वर येथील मारुती झावरे यांचे निधन पारनेर/प्रतिनिधी : टाकळी ढोकेश्वर येथील जुन्या पिढीतील प्रगतिशील शेतकरी राजकीय साम...
निधन वार्ता
टाकळी ढोकेश्वर येथील मारुती झावरे यांचे निधन
पारनेर/प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर येथील जुन्या पिढीतील प्रगतिशील शेतकरी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय असलेले मारुती महादू झावरे यांचे दुःखद निधन रविवार दि. २९ रोजी झाले त्यांच्या निधनामुळे टाकळी ढोकेश्वर गावावर तसेच झावरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कै. मारुती महादू झावरे यांच्या निधनामुळे टाकळी ढोकेश्वर येथील झावरे कुटुंबाने जुन्या पिढीतील एक अनुभवी व्यक्तिमत्व गमावले आहे. कै. मारुती महादू झावरे यांचे निधन झाल्यामुळे राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. त्यांना दोन भाऊ तीन मुलं दोन मुली सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे. टाकळी ढोकेश्वर येथील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलासराव झावरे यांचे ते चुलते तर संतोष झावरे, प्रशांत झावरे, सुहास झावरे यांचे ते वडील होते. त्यांचे मृत्युसमयी वय ६३ होते. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम टाकळी ढोकेश्वर येथे त्यांच्या राहत्या घरी करण्यात आला. त्यांच्या दुःखद निधनामुळे नातेवाईक मित्र परिवाराने शोक व्यक्त केला आहे. टाकळी ढोकेश्वर येथील दशक्रियाविधी घाटावर त्यांचा दशक्रिया विधी चा कार्यक्रम मंगळवार दिनांक ७ जून रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. यावेळी ह.भ.प. विलास महाराज लोंढे यांची प्रवचन सेवा होणार आहे.
COMMENTS