पारनेर तालुक्याची जिल्हा परिषद व पंचायत समितीची गट व गण रचना जैसे थे.. आता आरक्षण सोडतीकडे लक्ष पारनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद पंचायत समिती...
पारनेर तालुक्याची जिल्हा परिषद व पंचायत समितीची गट व गण रचना जैसे थे..
आता आरक्षण सोडतीकडे लक्ष
पारनेर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकांसाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट व गणांच्या प्रारूप रचनेवरील हरकतींवर सुनावणी पुर्ण झाल्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अंतिम गट व गण रचनेस मंजुरी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हयातील ८५ जिल्हा परिषदेचे गट व १७० पंचायत समितीच्या गणांची प्रारूप यादी प्रसिध्द केली होती. त्यावर हरकती मागविण्यात आल्यानंतर जिल्हयातून आलेल्या ६५ हरकती पैकी ८ हरकतींवर सुनावणी घेण्यात येऊन आक्षेप मान्य करण्यात आले. त्यानंतर दि. २२ जून रोजी गट व गण रचनेस अंतिम मान्यता देण्यात आली..
अंतिम गट व गण रचनेनंतर पारनेर तालुक्यातील जिल्हा व पंचायत समितीच्या गणांमध्ये समावेश असलेली गावे पुढील प्रमाणे :
◆ ढवळपुरी जिल्हा परिषद गट
ढवळपुरी पंचायत समिती गण :
खडकवाडी, पळशी, वनकुटे, तास, ढवळपुरी, भनगडेवाडी.
भाळवणी पंचायत समिती गण :
भाळवणी, काळकूप, माळकूप, पाडळी तर्फे कान्हूर, वडगांव आमली, भांडगांव, जामगांव, सारोळा आडवाई, देवणेगुंजाळ, लोणीहवेली,
◆ टाकळीढोकेश्वर जिल्हा परिषद गट
वासुंदे पंचायत समिती गण :
वासुंदे, देवडे, मांडवेखुर्द, पोखरी, काताळवेढा, डोंगरवाडी, पळसपूर, म्हसोबा झाप, वारणवाडी, कारेगाव
टाकळी ढोकेश्वर पंचायत समिती गण :
टाकळीढोकेश्वर, वडगांव सावताळ, गाजदीपुर, कर्जुलेहर्या, ढोकी, तिखोल
◆ कान्हूरपठार जिल्हा परिषद गट
कान्हूरपठार पंचायत समिती गण :
कान्हूरपठार, विरोली, पिंपळगांव तुर्क, पुणेवाडी, वेसदरे, करंदी, किन्ही, बहिरोबावाडी, गोरेगांव, डिकसळ, हिवरेकोरडा,
वडझिरे पंचायत समिती गण :
वडझीरे, शेरीकोलदरा, बाभुळवाडे, पाडळीदर्या, जाधवाडी, पिंपळगांव रोठा, वडगांव दर्या, अक्कलवाडी, पिंपरी पठार, गारगुंडी, रांधे, नांदुरपठार, सावरगांव, लोणीमावळा.
◆ निघोज जिल्हा परिषदगट :
अळकुटी पंचायत समिती गण :
अळकुटी, चौभूत, रेनवडी, शिरापूर, शेरी कासारे, कळस, पाडळी आळे, पाबळ, म्हस्केवाडी, गारखिंडी, दरोडी,
निघोज पंचायत समिती गण :
निघोज, मोरवाडी, ढवणवाडी, वडगांवगुंड, शिरसुले, वडनेर बुद्रुक, देवीभोयरे, पठारवाडी.
◆ जवळा जिल्हा परिषद गट :
जवळा पंचायत समिती गण :
जवळा, सांगवी सूर्या, सिध्देश्वर वाडी, गांजीभोयरे, चिचोली, पिंपरीजलसेन, गुणोरे, गाडीलगांव, राळेगण थेरपाळ, हकीकतपुर, माजमपुर,
वाडेगव्हाण पंचायत समिती गण :
वाडेगव्हाण, राळेगणसिध्दी, कुरूंद, यादववाडी, नारायणगव्हाण, मावळेवाडी, बटुले, कोहकडी
पिंपळनेर, म्हसे खुर्द,
◆ सुपा जिल्हा परिषद गट
रांजणगांव मशिद पंचायत समिती गण :
रांजणगांव मशिद, अपधूप, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, पाडळी रांजणगांव, कळमकरवाडी, पळवे बद्रुक, कड्स, पळवे खुर्द, म्हसणे, सुलतानपुर, वडनेरहवेली, गटेवाडी, घाणेगांव, वाघुंडे बुद्रुक, बाघुंडे खुर्द, जातेगांव, पानोली.
सुपा पंचायत समिती गण
सुपा, हंगे, शहांजापुर, मुंगशी, वाळवणे, रायतळे, पिंपरीगवळी, अस्तगांव, रूईछत्रपती,
अशी गट व गण रचना अंतिम करण्यात आली आहे.
COMMENTS