डॉ.भाऊसाहेब खिलारी यांना लोकमतचा हेल्थ आयकॉन पुरस्कार आरोग्य क्षेत्रातील कामाचा गौरव पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावचे सुप...
डॉ.भाऊसाहेब खिलारी यांना लोकमतचा हेल्थ आयकॉन पुरस्कार
आरोग्य क्षेत्रातील कामाचा गौरव
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावचे सुपुत्र खिलारी कुटुंबातील सदस्य आरोग्य सेवेच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर सारख्या ग्रामीण भागामध्ये जिल्हास्तरावर उत्तम कार्य करत असलेले डॉ. भाऊसाहेब खिलारी यांना नुकताच लोकमत माध्यम समूहाचा लोकमत हेल्थ आयकॉन पुरस्कार जाहीर झाला आहे.
आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना त्यांनी सामाजिक कामही मोठ्या प्रमाणात टाकळी ढोकेश्वर व पारनेर तालुक्यात केले आहे. सावली प्रतिष्ठान व साई सावली हॉस्पिटलच्या माध्यमातून ते नेहमी सामाजिक कामही करत असतात. आरोग्य सेवेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीब समाजातील रुग्णांना नेहमीच आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकमत समूहाने त्यांचा गौरव करून खऱ्या अर्थाने त्यांच्या या आरोग्य सेवेच्या सामाजिक कामालाच न्याय दिला आहे.
डॉ. भाऊसाहेब खिलारी हे अतिशय संयमी असे व्यक्तिमत्व असून गोरगरीब समाजासाठी नेहमीच कार्य करत राहणे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून गोरगरीब आदिवासी घटकातील समाजाला न्याय देणे व रुग्णांवर उपचार करून रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजसेवा करणे या उक्तीप्रमाणे ते काम करत असतात.
सावली प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर सारख्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी आजपर्यंत आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून शिबिरे घेत अनेक सर्वसामान्य रुग्णांवर उपचार केले आहेत.
आजारी रुग्णांवर मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी डॉक्टर हे नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत असतात.
डॉ. भाऊसाहेब खिलारी यांच्या या आरोग्य सेवेतील कामाचा लोकमत समूहाने गौरव केला आहे.