वेब टीम : पुणे दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या ...
वेब टीम : पुणे
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (ता. 17) जाहीर होणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. त्यानुसार, उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.
असा पाहा निकाल
दहावीचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
वेबसाइटच्या होमपेजवर ‘एसएससी निकाल-2022’ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर ‘Now’वर क्लिक केल्यानंतर जन्मतारखेसोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 पाहू शकाल.