अर्चना जाधव हिची कामगिरी कौतुकास्पद : शालिनीताई विखे पी.एस.आय.पदी निवड झाल्याने मांडवे खु. येथे सत्कार व सन्मान पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळ...
अर्चना जाधव हिची कामगिरी कौतुकास्पद : शालिनीताई विखे
पी.एस.आय.पदी निवड झाल्याने मांडवे खु. येथे सत्कार व सन्मान
पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे):
तालुक्यातील मांडवे खुर्द येथील कृषिकन्या अर्चना गणपत जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात नववा क्रमांक मिळविला असून एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पुर्ण करुन मुंबई आयुक्तालयात ती रूजू झाली आहे. या अगोदर सुद्धा तिच्या दोन बहिणी मिना गणपत जाधव व शितल गणपत जाधव यांनी पण या परिक्षेत यश मिळविले असून त्या ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयात नियुक्ती झाली आहे. या तीनही बहिणींनी आपल्या आई वडिलांचे व मांडवे खुर्द गावचे नाव रोशन केले आहे. निवड झाल्यामुळे मांडवे खु. या ठिकाणी नुकताच कु. अर्चना जाधव हिचा जाहीर सत्कार व सन्मान करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते पीएसआय पदी नियुक्त झालेल्या अर्चना जाधव यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी शालिनीताई विखे यांनी अर्चना जाधव हिच्या कामगिरीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते श्रीरंग पा.गागरे , जि.प.सदस्य राहुल शिंदे,विखे पाटील, कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र पा.पावडे, मांडवे खु. चे सरपंच सोमनाथ आहेर, वनकुटे येथील सामाजिक कार्यकर्ते डाॅ. नितीन रांधवण, खडकवाडीचे पोपटराव पा.गागरे, पळशीचे सुभाषराव गांधी, बाळासाहेब पा.जाधव व पंचर्कोशितील सर्व ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
कु. अर्चना जाधव या पीएसआय पदी निवड झाल्यामुळे विद्यार्थी वर्गासाठी त्या प्रेरणा ठरल्या आहेत. अतिशय कष्टप्रद प्रवास करत त्यांनी या यशाला गवसणी घातली आहे.
चौकट :
आई-वडिलांकडून लाख मोलाची शब्बासकी..
अर्चना व तिच्या बहिणींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे ध्येय मनाशी बाळ गून उत्तुंग भरारी घेतली आहे. शेतकरी कुटुंबातील जन्मलेल्या या मुलींनी आमच्या कष्टाचे चीज केले असून आम्हाला अभिमान असल्याचीही प्रतिक्रिया या मुलीचे आई-वडील गणपत व मंदा जाधव यांनी व्यक्त केली.
COMMENTS