तिखोल ग्रामपंचायत मध्ये शिवराज्यभिषेक दिन साजरा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा : संदीप ठाणगे पारनेर प्रतिनिधी : छत्रपती शिवाज...
तिखोल ग्रामपंचायत मध्ये शिवराज्यभिषेक दिन साजरा.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा : संदीप ठाणगे
पारनेर प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे प्रेरणास्थान असून त्यांनी दिलेले विचार आपण सर्वांनी आत्मसात करून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण नेहमी कार्य करत राहिले. पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी दैवत असून त्यांचा अभिमान आपण नेहमीच बाळगला पाहिजे असे मत निलेश लंके प्रतिष्ठानचे टाकळीढोकेश्वर गण प्रमुख युवा नेते संदीप ठाणगे यांनी व्यक्त केले.
तिखोल ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते . तिखोल ग्रामपंचायत समोर यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ ठकाजी देवराम ठाणगे यांच्या हस्ते राजदंडक व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
निलेश लंके प्रतिष्ठानचे टाकळी ढोकेश्वर गण प्रमुख संदिप ठाणगे, माजी सरपंच अनिल तांबडे, माजी सभापती अरुणराव ठाणगे, उपसरपंच चांद इनामदार, ग्रामपंचायत सदस्य संदिप कावरे, भाऊसाहेब ना. ठाणगे, दत्तात्रय सं. ठाणगे, उत्तम ठाणगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील ठाणगे, युवा नेते विजय ठाणगे, अरुण साळवे,
भाऊसाहेब ठाणगे, तुकाराम चि. ठाणगे, रावसाहेब ठाणगे, रामभाऊ ठाणगे, मारुती म. ठाणगे, हरिभाऊ य. ठाणगे गुरुजी, पोपट रा. ठाणगे, अनिल वि. ठाणगे, ज्ञानदेव म. ठाणगे, संदेश बर्वे, ग्रामसेवक दरेकर भाऊसाहेब, सोसायटीचे संचालक बाळू ना. ठाणगे, उत्तम साळवे, भाऊसाहेब मंचरे, मगबुल इनामदार, आदि ग्रामस्त उपस्थित होते.