वाढदिवस विशेष.. किरण कोकाटे एक समाजशील राजकारणी खासदार सुजयदादा विखे यांचे एकनिष्ठ सहकारी विखे समर्थक म्हणून तालुक्यात निर्माण केली ओळख युवक...
वाढदिवस विशेष..
किरण कोकाटे एक समाजशील राजकारणी
खासदार सुजयदादा विखे यांचे एकनिष्ठ सहकारी
विखे समर्थक म्हणून तालुक्यात निर्माण केली ओळख
युवकांमध्ये लोकप्रिय असलेले नेतृत्व किरण कोकाटे
सत्तेच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडणारे प्रखर नेतृत्व
पारनेर तालुक्याच्या भाजपचे प्रखर नेते
पारनेर विशेष प्रतिनिधी :
पारनेर भाजपचा आक्रमक चेहरा कट्टर विखे समर्थक म्हणून किरण कोकाटे ओळखले जातात कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात समाजकारणात किरण कोकाटे काम करत आहेत. युवकांचे संघटन असलेले किरण कोकाटे यांचा जन्म ८ जून १९९३ रोजी झाला मूळचे पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील असलेले किरण कोकाटे यांचे वडील बाळासाहेब कोकाटे हे कुटुंबासह व्यवसायानिमित्त पारनेर शहरामध्ये स्थाईक झाले त्यामुळे किरणचे प्राथमिक शिक्षण हे पारनेरच्या विनायक मंदिर शाळेत झाले पुढे शालेय शिक्षणासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिक शाळा, लोणी प्रवारा येथे पूर्ण केले. शालेय जीवनामध्ये खेळाची आवड असल्यामुळे किरण कोकाटे हे जिल्हा व राज्य स्तरावर खो-खो चे खेळाडू होते. लहानपणापासूनच उत्तम संघटन कौशल्य त्यामुळे मोठा मित्रपरिवार त्यांनी जमवला आहे.
उच्च शिक्षणासाठी त्यांनी पारनेरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये प्रवेश घेतला यावेळी त्यांना विद्यार्थिदशेत मध्ये मोठा मित्रपरिवार मिळाला असल्याने पारनेर या ठिकाणी तालुक्याच्या विविध भागातून कॉलेजला शिक्षणासाठी येणारे अनेक विद्यार्थी होते व असतात किरण हा अतिशय संघटनात्मक पातळीवर काम करणारा युवक होता यावेळी तालुक्यातील दुर्गम भागातून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न किरणला दिसत होते. ते सोडवण्यासाठी किरण कोकाटे यांनी वेळोवेळी प्रयत्न केले.
विद्यार्थीदशेत काम करत असताना किरण कोकाटे काही हिंदुत्ववादी संघटनांशी ही जोडले गेले. विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी किरण कोकाटे यांनी विद्यार्थीदशेत मध्ये अनेक आंदोलने मोर्चे काढले विद्यार्थ्यांना शालेय फी मध्ये सवलत मिळावी तसेच विद्यार्थ्यांच्या निर्माण होणाऱ्या एसटी बस प्रश्नासंदर्भात त्यांनी वेळोवेळी पारनेर या ठिकाणी आंदोलने केली व प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. त्याकाळी किरण कोकाटे हे प्रखर हिंदुत्ववादी युवा नेते म्हणून तालुक्यामध्ये परिचित होते हिंदुत्ववादी संघटनांमध्ये काम करत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रेरणा मानून अनेक आंदोलनांमध्ये आपला सहभाग नोंदवला. त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांवर अपशब्द वापरणाऱ्या यांच्या विरोधात किरण कोकाटे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली दिसते.
या माध्यमातून काम करत असताना किरण कोकाटे यांनी पारनेर तालुक्यात मोठा मित्र परिवार जमवला त्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उभे राहिले. पुढे राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये ते पूर्णतः सक्रिय झाले. अशा पद्धतीने काम करत असताना त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम केले व हरेश्वर ऍग्रो या कृषी व्यवसायाच्या माध्यमातून ते अनेक शेतकऱ्यांना सेवाही देण्याचे काम करत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी किरण कोकाटे हे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत असताना व शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनांमध्ये किरण कोकाटे हे सहभागी होत असताना पारनेर या ठिकाणी दूध प्रश्नावर किरण कोकाटे यांनी आक्रमक आंदोलन केले होते. राजकीय जीवनामध्ये वाटचाल करत असताना भारतीय जनता पार्टीचे विचारधारा त्यांनी स्वीकारली आहे.
दरम्यान किरण कोकाटे पारनेर तालुक्यातील एक उदयन्मुख युवा नेतृत्व म्ह्णून उदयास आले असून सध्या भारतीय जनता पार्टीच्या पारनेर शहराध्यक्ष पदी कार्यरत आहे. तालुक्यात विखे समर्थक म्हणून सध्या ओळखले जातात. किरण कोकाटे हे युवकांमध्ये लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व असून आणि नेहमी हसतमुख असलेले हे व्यक्तिमत्व आज पारनेर तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना पारनेर शहर व परिसरात मोठे युवकांचे संघटन त्यांनी उभे केले आहे. खासदार सुजयदादा विखे यांचे अतिशय जवळचे सहकारी किरण कोकाटे समजले जातात. खासदार विखे यांच्यामागे त्यांनी मोठी युवकांची फळी उभी केली आहे.
युवा संघटन तगडे असलेले किरण कोकाटे सध्या भारतीय जनता पार्टीच्या पारनेर शहर अध्यक्ष पदी कार्यरत असून पारनेर शहरातील सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवत आहेत. खासदार विखे यांनी घेतलेल्या वयोश्री योजनेच्या माध्यमातून पारनेर शहर व परिसरातील अनेक जेष्ठ दिव्यांग अपंग गरीब कुटुंबांना त्यांनी वैयक्तिक लाभ मिळवून दिला आहे. युवकांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक प्रश्नावर ते नेहमी काम करत आहेत. हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेले किरण कोकाटे ही युवकांमध्ये अतिशय लोकप्रिय असून त्यांचा मित्रपरिवार तालुक्यात खूप मोठा आहे युवाहृदयसम्राट ही बिरुदावली कमी पडेल असे असलेले हे व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थाने पारनेर तालुक्याच्या राजकारणाचे भविष्य आहे. अनेक चढ-उतार पहात आपली राजकीय वाटचाल करणारे किरण कोकाटे आज विखे समर्थक म्हणून तालुक्याला परिचित झाले आहे.
युवा नेते किरण कोकाटे समाजा मध्ये काम करत असताना समाजाचे अनेक प्रश्न घेऊन ते सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात कोरोना काळातही त्यांनी उत्तम असं काम केले तसेच सामाजिक कामाच्या माध्यमातून ते नेहमी सक्रिय असतात. किरण कोकाटे बोलताना नेहमी म्हणतात की खासदारसाहेब सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकासाचे कामे मार्गी लावायचे आहे. युवकांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करायचे असून शेतकऱ्यांच्या हिताचे ही पाणी प्रश्न असून ती सोडवण्यासाठी हि मी यापुढील काळात काम करणार आहे तसेच मुख्य तालुक्याच्या पाणी प्रश्नावर ही यापुढील काळात मला काम करायचे आहे व तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामुख्याने खासदार सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून काम करणार आहे.
सक्रिय युवा नेतृत्व असलेले किरण कोकाटे जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करतात. उदयन्मुख प्रगल्भ विचारांच्या युवा नेतृत्वाला पुढील राजकीय सामाजिक वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा.. आपला वाढदिवस किरण कोकाटे नेहमी सामाजिक उपक्रम राबवून दरवर्षी साजरा करत असतात वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी समाजामध्ये व युवकांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. युवा पिढीसाठी आदर्शवत काम सध्या किरण कोकाटे करत असून अशा या पाण्याच्या राजकारणातील भविष्य असलेल्या युवा नेतृत्वाला अभिष्टचिंतन सोहळा निमित्त व वाढदिवसानिमित्त हार्दिक लाख लाख शुभेच्छा...
COMMENTS