शिवसेनेचा मला खासदार करण्यामध्ये ५०% वाटा : सुजय विखे पाटील पारनेर तालुक्याची सत्ता चुकीच्या माणसाच्या हातात राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे...
शिवसेनेचा मला खासदार करण्यामध्ये ५०% वाटा : सुजय विखे पाटील
पारनेर तालुक्याची सत्ता चुकीच्या माणसाच्या हातात
राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे
खासदार सुजय विखे यांचे टीकास्त्र
रांजणगाव मशीद येथे राहुल पाटील शिंदे यांचा वाढदिवस कार्यक्रम
पारनेर प्रतिनिधी :
जिल्ह्यातील व पारनेर तालुक्यातील शिवसेनेचा मला खासदार करण्यामध्ये 50% वाटा असून मी खऱ्या शिवसैनिकाला कधीही वार्यावर सोडणार नाही राष्ट्रवादी शिवसेनेला संपवण्याचे काम करत असून राज्यसभा निवडणुकीचा निकालामध्ये त्याचा प्रत्यय आला आहे. असे सुजय विखे म्हणाले पारनेर तालुका हा चुकीच्या लोकांच्या हातात असून तालुक्यातील वैचारिक संस्कृती मोडीत काढण्याचा याठिकाणी प्रयत्न सुरू आहे गुन्हेगारी वृत्तीला या तालुक्यात खतपाणी घातले जात आहे हा वैचारिक तालुका वेगळा वळणावर जात आहे त्यामुळे राहुल पाटील शिंदे सारख्या सुसंस्कृत नेतृत्वाला हा तालुका संधी कधी देणार असे मत शिंदे यांच्या वाढदिवस कार्यक्रमात बोलताना त्यांनी व्यक्त केले.
तसेच यावेळी माजी आमदार विजय औटी म्हणाले शिंदे कुटुंब हे तालुक्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे असून राहुल पाटील शिंदे त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहे. तसेच यावेळी कोरडे, चेडे, शेळके यांची भाषणे झाली.
रांजणगाव मशीद येथे राहुल पाटील शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन खासदार सुजय विखे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पारनेर तालुक्याचे माजी आमदार विजयराव औटी, सभापती गणेश शेळके, युवा नेते सचिन वराळ, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, ऍड. बाबासाहेब खिलारी, बाळासाहेब माळी, शंकर नगरे, प्रियंका शिंदे, अश्विनी थोरात, योगेश रोकडे, दीपक पवार, सागर मैड, मोहन रोकडे, बंडू रोहोकले, अभिजीत शिंदे, निलेश खोडदे, किरण कोकाटे, कैलास कोठावळे, मनोज मुंगसे, लहू भालेकर, प्रीती साबळे, डॉ. अजय येणारे, शरद सरोदे, बंटी साबळे, बाबा जवक, विनोद जवक, भिमाजी शिंदे, रामभाऊ मांडगे, ज्ञानेश्वर वरखडे, निलेश घोडे, मधुकर पठारे, विश्वनाथ झिंजाड, प्रकाश इघे इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.