टाकळी ढोकेश्वरकरांनी दहशतवाद मोडीत काढला : सुजीत झावरे पाटील नवनिर्वाचित संचालकांचा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सन्मान पारनेर प्रतिनिधी ...
टाकळी ढोकेश्वरकरांनी दहशतवाद मोडीत काढला : सुजीत झावरे पाटील
नवनिर्वाचित संचालकांचा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सन्मान
पारनेर प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार पारनेर तालुक्याचे सुसंस्कृत नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते देवकृपा प्रतिष्ठान व सुजीत झावरे पाटील मित्र परिवाराच्या वतीने टाकळी ढोकेश्वर येथील देवकृपा जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की टाकळी ढोकेश्वर ही परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असून या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे प्रश्नही सोडवले जात असतात सेवा सोसायटीच्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दहशतवाद व गुंडशाही मोडीत काढली आहे.
शांत व संयमी विकासाभिमुख नेतृत्वाला खऱ्या अर्थाने लोकांनी आता स्वीकारले असून सोसायटीच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर परिसरामध्ये यापुढील काळात राजकीय विकासभिमुख परिवर्तन अटळ आहे.
तसेच यावेळी टाकळी ढोकेश्वर माजी सरपंच युवा नेते शिवाजीराव खिलारी म्हणाले की खऱ्या अर्थाने दहशतवाद व गुंडशाही हे मोडीत निघाली आहे. आता यापुढे आदर्श असा टाकळी ढोकेश्वरचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहे.
यावेळी सत्कार प्रसंगी
ज्येष्ठ नेते नवनिर्वाचित सेवा सोसायटी संचालक नारायण झावरे, पारनेर तालुका बाजार समिती उपसभापती विलासराव झावरे, महेश पाटील, अशोक पायमोडे, मल्हारी धुमाळ, नानासाहेब बांडे, भाऊसाहेब बोरुडे, श्रावण गायकवाड, महेश झावरे, प्रमोद खिलारी, गंगाधर बांडे, बापूसाहेब रांधवण, किसनराव धुमाळ, सुशांत लोंढे, ज्येष्ठ पत्रकार बबनराव गायखे, प्रमोद झावरे, बाळासाहेब पाटील, स्वप्निल राहिंज, आदी उपस्थित होते तसेच देवकृपा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.