तरुणांनी समाजहितासाठी काम करावे : जालिंदर वाबळे उद्योजक अतुल दाते यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पारनेर प्रतिनिधी : तरुण ही खऱ्या अर्थाने द...
तरुणांनी समाजहितासाठी काम करावे : जालिंदर वाबळे
उद्योजक अतुल दाते यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पारनेर प्रतिनिधी :
तरुण ही खऱ्या अर्थाने देशाची ताकद असून तरुणांमध्ये बदल घडविण्याची खरी उमेद आहे. त्यामुळे तरुण हाच खऱ्या अर्थाने देशाचे भवितव्य असून तरुणांनी देश हितासाठी व समाजासाठी उपक्रमशील काम करत राहणे गरजेचे आहे असे मत जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे यांनी व्यक्त केले.
वासुंदे गावचे यशस्वी उद्योजक अतुल दाते यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत सामाजिक उपक्रम राबवून अतुल दाते यांनी सामाजिक आदर्श घालून दिला. असे ही वाबळे यावेळी म्हणाले
वाढदिवसानिमित्त टाकळी ढोकेश्वर येथील बनाई वस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच वासुंदे येथील वाबळे वस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देत अतुल दाते यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक दातृत्व दाखवले आहे.
अतुल दाते यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल उगले, पारनेर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष पोपट उर्फ पप्पू पायमोडे, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पारनेर तालुका अध्यक्ष पप्पू कासुटे, लोहार संघटनेचे किरणभाऊ पोपळघट, युवा नेते सुमितभैय्या औटी, दिनकरराव वाबळे, आनंदा वाबळे, मच्छिंद्र वाबळे, साहिल वाबळे, गणेश झोंबाडे, लक्ष्मण चेमटे गुरुजी, अमोल झावरे, अण्णासाहेब चौरे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
COMMENTS