--> भंडारदरा धरण ७८ टक्के भरले | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

भंडारदरा धरण ७८ टक्के भरले

भंडारदरा धरण ७८ टक्के भरले अहमदनगर प्रतिनिधी :  महाराष्ट्रातील प्रमुख धरणापैकी एक महत्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण ७८ टक्के भरले आहे. धरणा...

भंडारदरा धरण ७८ टक्के भरले




अहमदनगर प्रतिनिधी : 
महाराष्ट्रातील प्रमुख धरणापैकी एक महत्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण ७८ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोटात ओढे नाले खळाळून वहात असल्याने भंडारदरा धरणाच्या पाण्यात वाढ होतच आहे; परंतु धरणाच्या पाणलोटात मात्र रविवारी पुन्हा पावसाने उसंत घेतल्याचे दिसून आले.


अकोले तालुक्यात भंडारदरा धरण प्रमुख धरणापैकी एक महत्वाचे धरण समजले जाते. या धरणाच्या पाणलोटात जुन महिना कोरडा गेल्यानंतर १ जुलैपासून पावसाने धो-धो बरसने सुरू केले होते. पहिल्या पंधरवाड्यात पावसाने धुव्वाँधार बॅटींग केल्याने खपाटीला गेलेले भंडारदरा धरण भरण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसून आले. मागील आठवड्यात तर पावसाने भंडारदरा पाणलोटासह कळसुबाई शिखराच्या भागातही हाहाकार केल्याने आदिवासी बांधवाची भातशेतीही पाण्याखाली गेली होती; परंतु भंडारदरा धरणात दररोज पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत गेल्याने धरणाचा पाणीसाठा वाढतच गेला. रविवारी (१७) हा साठा ८ हजार ७२० दशलक्ष घनफुटापर्यंत पोहचल्याने भंडारदरा धरण ७८ टक्के भरले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.


गेल्या २४ तासात भंडारदरा येथे १०५ मिमी पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे १२६ मिमी तर रतनवाडी येथे १२९ व वाकी येथे ८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कृष्णावंती नदीवरील वाकी लघुबंधाराही भरलेला असून कृष्णावंती नदी ५७८ क्युसेक्सने वाहत आहे. गत २४ तासात भंडारदरा धरणात ५२५ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. तर १२ तासामध्ये १६८ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८ हजार ७२० दशलक्ष घनफूट झाला आहे. निळवंडे धरणही ७४ टक्के भरले असुन पाणीसाठा ६ हजार २१४ दशलक्ष घनफूट झाल्याची माहिती निळवंडे धरण शाखेचे प्रमुख कुणाल चोपडे यांनी सांगितले आहे. १२ तासात भंडारदरा येथे १५ मिमी पावसाची नोंदणी झाली असल्याची माहिती भंडारदरा धरण शाखेचे शाखाधिकारी अभिजित देशमुख यांनी दिली.




COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: भंडारदरा धरण ७८ टक्के भरले
भंडारदरा धरण ७८ टक्के भरले
https://lh3.googleusercontent.com/-C7xyowZ1AMk/YtSr7F3p8kI/AAAAAAAASdI/WgTW1mAGegASuasZ9MofKFA9ekIvL-HLgCNcBGAsYHQ/s1600/9981%257E2.jpg
https://lh3.googleusercontent.com/-C7xyowZ1AMk/YtSr7F3p8kI/AAAAAAAASdI/WgTW1mAGegASuasZ9MofKFA9ekIvL-HLgCNcBGAsYHQ/s72-c/9981%257E2.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/07/blog-post_64.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/07/blog-post_64.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content