वडझिरे येथून मोटारसायकलची चोरी पारनेर/प्रतिनिधी : वडझिरे येथून घरासमोर लॉक करून लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात तिघा चोरांनी...
वडझिरे येथून मोटारसायकलची चोरी
पारनेर/प्रतिनिधी :
वडझिरे येथून घरासमोर लॉक करून लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात तिघा चोरांनी हॅन्डेल हॉक तोडून लांबविल्याची घटना घडली. तिघेही चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
दि. १४ जुलै रोजी रात्री वडझिरे येथील अमिन बाबुलाल मनियार हे आपल्या घराबाहेर मोटारसायकल ( क्र. एम.एच.१६ बी एन २२७६) हॅन्डेल लॉक करून घरात कुटूंबासह झोपले होते. दि. १५ जुलै रोजी पहाटे २ ते२.१५ च्या दरम्यान एका मोटारसायकलवरून तिघे त्यांच्या घराजवळ आले. त्यापैकी एकाने मनियार यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर या मोटारसायकलचे हॅन्डेल लॉक झटका मारून तोडले. त्यानंतर दुचाकीचा आवाज येऊन मनियार व त्यांचे कुटूंबिय जागे होऊ नये म्हणून घरापासून मोटारसायकल ढकलीत नेण्यात आली. पुढे गेल्यानंतर
स्विचच्या वायर तोडून दुचाकी सुरू करून लांबविण्यात आली असावी असा संशय आहे.
सकाळी उठल्यानंतर दुचाकी लांबविण्यात आल्याचे मनियार यांच्या लक्षात आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे दोनच्या दरम्यान तिघे चोरटे दुचाकीवरून मनियार यांच्या घरावजळ आल्याचे व हॅन्डेल लॉक तोडून एक जण दुचाकी ढकलीत घेऊन गेल्याचे त्यात कैद झाले आहे. त्यानंतर मनियार यांनी दिवसभर दुचाकीचा शोध घेतला मात्र मिळून आली नाही. अखेर पारनेर पोलिस ठाण्यात जात पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज सुपूर्द करीत अज्ञात तिघांविरोधात त्यांनी चोरीची फिर्याद दाखल केली. पोलिस हे. कॉ. भोसले यांनी घटनास्थळास भेट देत पंचानामा केला. त्यानंतर अज्ञात तीन चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. भोसले हे पुढील तपास करीत आहेत.