--> राजेश्वरी कोठावळे यांना झेडपी पंचायत समिती निवडणुकीत संधी मिळणार का ? | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

राजेश्वरी कोठावळे यांना झेडपी पंचायत समिती निवडणुकीत संधी मिळणार का ?

राजेश्वरी कोठावळे यांना झेडपी पंचायत समिती निवडणुकीत संधी मिळणार का ? नवीन चेहरा म्हणून दिली जाऊ शकते संधी; आमदार निलेश लंकेंचे युवावर्गाला ...

राजेश्वरी कोठावळे यांना झेडपी पंचायत समिती निवडणुकीत संधी मिळणार का ?


नवीन चेहरा म्हणून दिली जाऊ शकते संधी; आमदार निलेश लंकेंचे युवावर्गाला प्रोत्साहन देण्याचे धोरण !




पारनेर प्रतिनिधी :
 तालुक्यातील महिलांचे एक कणखर नेतृत्व म्हणून समोर येत असलेली युवा युवती राजेश्वरी कोठावळे सध्या आपल्या कामाच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकीय पटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण करू पाहात आहे.  राजेश्वरी कोठावळे यांचे  आमदार निलेश लंके यांच्या  मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काम सुरु आहे. त्या नेहमीच राजकारण न करता सामाजिक कामांच्या माध्यमातून कार्यरत असतात. पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली कोरोनाच्या जागतिक संकटात राजेश्वरी कोठावळे यांनी जे काम उभे केले ते खरंच वाखाण्याजोगे आहे. एक महिला म्हणून स्वतःच्या जीवावर उदार राहत कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी त्या काम करत होत्या. त्यांच्या कामाची आज तालुक्यात प्रशंसा होत असून आमदार निलेश लंके यांचे असलेले मार्गदर्शन यामुळे त्या पूर्ण झोकून देऊन सध्या सामाजिक काम करत आहेत.  


राजेश्वरी कोठावळे या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सहभागी असतात तसेच समाजातील दीनदलित दुर्बल घटकांसाठी त्या कार्य करत असतात. त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी काम केले असून महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात अनेक आंदोलने मोर्चे जनतेच्या हितासाठी आजपर्यंत केले आहेत. पारनेर तालुक्याच्या राजकीय पटलावर त्या एक प्रखर आक्रमक महिला युवतीनेतृत्व म्हणून समोर येत आहे.  महिलांच्या हक्कासाठी लढणारी ही युवती तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असून त्या अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष या पदावर सध्या कार्यरत आहेत. आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे तालुक्‍यात सुरू असलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे.  

राजेश्वरी कोठावळे यांच्या राजकीय सामाजिक कामाचा आवाका पाहता भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वरिष्ठांकडून निवडणूक लढण्याची संधी मिळाल्यास तालुक्याच्या राजकारणात एक आक्रमक लढाऊ जिद्दी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करणारी सर्वात कमी वयाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून जाणारी तालुक्यातील पहिली युवती नेतृत्व ठरेल.  राजेश्वरी कोठावळे या तालुक्यातील नव्याने निर्माण झालेल्या जवळा या जिल्हा परिषद गटातील जवळा गणातील सांगवी सूर्या येथील असून गणातील आरक्षण हे सर्वसाधारण महिला निघाल्यामुळे पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन चेहरा म्हणून त्यांना  संधी दिल्यास एक चांगली सक्षम महिला नेतृत्व म्हणून त्या नक्कीच समोर येतील.  


पक्ष संघटनेत त्यांचे सुरू असलेले काम हे सर्वोत्तम असून राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी त्यांच्या कामाची पद्धत पाहून त्यांना अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदावर  काम करण्याची संधी दिली सक्षणा सलगर आणि राजेश्वरी कोठावळे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.  तालुक्यात आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून त्या उत्तम असं कार्य करत आहेत. आमदार निलेश लंके यांचे सध्या तालुक्यातील अनेक युवा वर्गाला नेतृत्व करण्याची संधी देण्याचे धोरण आहे ते पाहता राजेश्वरी कोठावळे यांना निश्चितच पक्षाच्या माध्यमातून आमदार निलेश लंके मोठी संधी उपलब्ध करून देतील.  

   आमदार निलेश लंके देत आहेत युवावर्गाला नेतृत्व करण्याची संधी..  
 
पारनेर तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधात आमदार निलेश लंके यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा आमदार निलेश लंके यांची कामाची असलेली पद्धत पाहता ते सध्या तालुक्यातील युवा वर्गाला प्रोत्साहन देत असून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत ते अनेक युवकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची संधी देतील यात तिळमात्र शंका नाही.  आमदार लंके यांच्या माध्यमातून काम करत असलेल्या राजेश्वरीताई कोठावळे यांचे काम पाहता त्यांनाही लवकरच आमदार चांगली संधी देतील. 
 आक्रमक महिला युवा नेतृत्व म्हणून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय.. 

 राजेश्वरी कोठावळे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सध्या काम करत असून त्या पारनेरच्या राजकारणात चांगल्या सक्रिय झाल्या आहेत. आमदार निलेश लंके यांना आपली प्रेरणास्रोत त्या समजतात आमदार लंके च्या सामाजिक उपक्रमांत नेहमीच पुढे असतात तालुक्यात सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आक्रमक युवती म्हणून त्या काम करत आहेत.  त्यांचे आमदार निलेश लंके  यांच्या कुटुंबासोबत असलेले घनिष्ट संबंध नक्कीच त्यांना पुढील राजकीय दिशा मिळण्यासाठी फायद्याचे ठरतील.




COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: राजेश्वरी कोठावळे यांना झेडपी पंचायत समिती निवडणुकीत संधी मिळणार का ?
राजेश्वरी कोठावळे यांना झेडपी पंचायत समिती निवडणुकीत संधी मिळणार का ?
https://lh3.googleusercontent.com/-tl2Ne3Y62oE/YuajLxO6NvI/AAAAAAAATc4/MzMmxMPPxgoQyEtdr2c9wIcphw67FDktwCNcBGAsYHQ/s1600/Screenshot_20220731_210402%257E2.jpg
https://lh3.googleusercontent.com/-tl2Ne3Y62oE/YuajLxO6NvI/AAAAAAAATc4/MzMmxMPPxgoQyEtdr2c9wIcphw67FDktwCNcBGAsYHQ/s72-c/Screenshot_20220731_210402%257E2.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/07/blog-post_698.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/07/blog-post_698.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content