वाढदिवस विशेष... आक्रमक तरुणाईचा आश्वासक चेहरा किरण उर्फ रामभाऊ तराळ गणेश जगदाळे/पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये काम करत असताना टा...
वाढदिवस विशेष...
आक्रमक तरुणाईचा आश्वासक चेहरा किरण उर्फ रामभाऊ तराळ
गणेश जगदाळे/पारनेर
तालुक्याच्या उत्तर भागामध्ये काम करत असताना टाकळी ढोकेश्वर गावचे उपसरपंच युवा नेते किरण उर्फ रामभाऊ तराळ यांनी राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून परिसरामध्ये व तालुक्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रामभाऊ तराळ यांनी आपल्या समाजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने आपल्या तरुण विद्यार्थी वयातच २००३ व २००४ पासून केली. संघर्षाचा खडतर प्रवास करत आपल्या स्वकर्तुत्वावर टाकळी ढोकेश्वर परिसरात व तालुक्यात समाजकारणात राजकारणात सक्रिय राहिले व काम करत असताना त्यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले. तरुणांच्या प्रश्नांवर व समस्यांवर रामभाऊ तराळ हे लढत राहिले . तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन भाऊ आजही काम करत आहेत. संघर्षशील युवा नेतृत्व कसे असते हे किरण उर्फ रामभाऊ तराळ यांच्याकडे पाहिल्यानंतर समजते. पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात तरुणांची युवकांची फौज सोबत असलेलं दमदार नेतृत्व म्हणून आज रामभाऊ तराळ यांच्याकडे पाहिले जाते.
टाकळी ढोकेश्वर भागामध्ये काम करत असताना भाऊंनी सर्वात पहिल्यांदा मराठा महासंघाच्या माध्यमातून आपले सहकारी तालुक्याचे दमदार नेतृत्व तत्कालीन तालुकाध्यक्ष व जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक निघोज गावचे सरपंच स्व. संदीप पाटील वराळ यांच्या माध्यमातून संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. संघटनात्मक पातळीवर काम करताना समाजासाठी वाहून घेतले. अनेक युवकांना एकत्र करत शासन स्तरावर विविध आंदोलनात्मक भूमिका घेत लढे उभारले.
२००७ पासून विविध सामाजिक आंदोलनांमध्ये रामभाऊ तराळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सहभाग घेतला. मराठा महासंघाच्या माध्यमातून काम करत असताना मराठा आरक्षणासाठी भाऊ हे शासन दरबारी भांडत राहिले व आजही भांडत आहेत. विद्यार्थी वर्गाच्या प्रश्नांवरही भाऊंनी तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये अनेक आंदोलने केली. आंदोलनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रामभाऊ तराळ यांचे नेतृत्व उदयास आले आहे. समाजकारण राजकारण करत असताना भाऊंनी विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षरोपण, विविध क्रिकेट व कबड्डी सारख्या क्रीडा स्पर्धा, शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय असलेल्या बैलगाडा स्पर्धा रामभाऊंनी आयोजित करत अनेक विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले. त्याचा अनेक सर्वसामान्य लोकांना फायदा झाला.
त्यांच्या या कार्याची दखल घेत मराठा महासंघाचे त्यांचे मार्गदर्शक नेतृत्व असलेले संभाजीराव दहातोंडे यांनी त्यांना मराठा महासंघाच्या माध्यमातून २०१० साली पारनेर तालुका अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. त्यानंतरच खऱ्या अर्थाने रामभाऊ तराळ यांचे राजकारण व समाजकारण हे फुलू लागले.
आपले सहकारी मित्र स्व. संदीप पाटील वराळ यांच्या सोबत तालुक्यात काम करत असताना मराठा महासंघ व पारनेर तालुका जाणता राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून किरण उर्फ रामभाऊ तराळ यांनी पूर्ण तालुक्यामध्ये युवकांचे मोठे संघटन उभे केले. या संघटनेच्या माध्यमातून युवकांचे अनेक प्रलंबित प्रश्न व समस्या सोडवण्यावर खऱ्या अर्थाने भर दिला. त्यामुळे तालुक्यात निघोज गावचे स्व. संदीप पाटील वराळ व टाकळी ढोकेश्वर गावचे किरण उर्फ रामभाऊ तराळ ही वराळ आणि तराळ जोडी आक्रमक युवा नेतृत्व म्हणून ओळखली जाऊ लागली. तत्कालीन काळात जाणता राजा प्रतिष्ठान व मराठा महासंघाच्या माध्यमातून तालुक्यात सर्वात मोठी युवकांची फळी यांच्यासोबत काम करत होती. व आजही हे संघटन टिकून आहे. आपला जिवाभावाचा सहकारी पाठीराखा संदीप पाटील वराळ यांच्या निधनानंतरही रामभाऊ तराळ हे खचले नाहीत त्यांनी आपल्या युवा सहकार्यांना ताकद दिली व मी तुमच्या सर्वांसोबत आहे तुमच्या लाडक्या संदीप उर्फ गोंड्या पाटलाची मी तुम्हाला कोणालाही कधी उणीव भासू देणार नाही ही आशा रामभाऊंनी खऱ्या अर्थाने आपल्या सर्व युवा सहकाऱ्यांना दाखवली. प्रत्येक तरुण सहकार्याच्या पाठीमागे आजही भाऊ खंबीरपणे उभे आहेत. संघर्षाला झिडकारत रामभाऊ तराळ यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे पुढे
समाजकारणात राजकारणात काम करत असताना रामभाऊ तराळ यांनी स्थानिक पातळीवर निवडणुका लढविल्या यामध्ये यश अपयश पचवत ते लढत राहिले २०२१ साली झालेल्या टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत रामभाऊ तराळ हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले.
या निवडणुकीत रामभाऊ तराळ यांनी करिष्मा करत बहुमत मिळवत निवडणूक एकतर्फी जिंकली. त्यामुळे खऱ्या अर्थाने रामभाऊ तराळ यांना तालुक्यातील उत्तर भागातील सर्वात मोठ्या टाकळी ढोकेश्वर सारख्या बाजारपेठ असलेल्या ग्रामपंचायत मध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली. टाकळी ढोकेश्वर गावच्या सर्वांगीण विकासासाठी रामभाऊ तराळ यांनी मोठ्या झपाट्याने काम करण्यास सुरुवात केली त्यामुळे भाऊंना २०२२ मध्ये गावचे उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. उपसरपंच म्हणून संधी मिळाल्यानंतर भाऊंनी गावातील विविध विकास कामे मोठ्या झपाट्याने करण्यास सुरुवात केली आहे. पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून रामभाऊ तराळ हे टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत मध्ये उपसरपंचपदी उत्तम असे काम करत असून आमदार निलेश लंके यांचे असलेले सहकार्य व निलेश लंके यांनी विविध विकास कामांसाठी टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतला दिलेले उजवे माप हे खरे अर्थाने रामभाऊ यांच्यावर असलेले प्रेमच आहे. किरण उर्फ रामभाऊ तराळ यांनी आपल्या युवकांचे संघटन पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या पाठीमागे उभे केले आहे. तालुक्याच्या उत्तर भागामध्ये युवकांची बळकट संघटना रामभाऊ तराळ यांच्यासोबत असून आमदार निलेश लंके यांना खऱ्या अर्थाने तालुका स्तरावर ताकद देण्याचा प्रयत्न टाकळी ढोकेश्वर गावचे उपसरपंच किरण उर्फ रामभाऊ तराळ हे करत आहेत.
दरम्यान टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत वर उपसरपंच पदी काम करण्याची संधी मिळाल्यामुळे गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी रामभाऊ तराळ हे नेहमीच सक्रिय असून गावात विकासाचा आलेख त्यामुळे वाढत आहे. नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे ही बाजारपेठ तालुक्यात सर्वाधिक वेगाने वाढत असून विकासाच्या दिशेने झेप घेत आहे. अशा या सर्वांगीण विकसनशील असलेल्या टाकळी ढोकेश्वर च्या राजकीय सामाजिक भविष्याचा तसेच विकासाचा चेहरा म्हणून किरण उर्फ रामभाऊ तराळ यांच्याकडे पाहिले जात आहे. अशा या युवा दमदार नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त हार्दिक लाख लाख शुभेच्छा...