पारनेचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले - सुनिल फापाळे पारनेरवासीयांकडुन मुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान पारनेर प्रतिनिधी :...
पारनेचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले - सुनिल फापाळे
पारनेरवासीयांकडुन मुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील विविध प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले. तालुक्यातील विविध समस्यांबाबत पाठपुरावा करून ते सोडविण्यासाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फापाळे यांनी केले.
गारगुंडी (ता. पारनेर) येथील शिवमंदिर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व ठाणे येथील ज्ञानदाता शैक्षणिक संकुलाचे संचालक, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील फापाळे, पालगर पतपेढीचे माजी अध्यक्ष बाबाजी फापाळे, महाराष्ट्र राज्य जुन्या पेन्शन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे यांनी ठाणे येथील टेंभी नाका परिसरातील आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पारनेरकरांच्या वतीने त्यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते.
फापाळे म्हणाले, की ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा ठाणेकर व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर विराजमान होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या ठाणे मनपा शाळेत शिक्षण घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोचलेले शिंदे हे आपल्या अभिमानाचे प्रतीक आहेत.