रेनवडी येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम पारनेर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचा वा...
रेनवडी येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस पारनेर तालुक्यात विविध ठिकाणी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. तालुक्यातील रेनवडी येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या पेन व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम रेनवडी गावचे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय येवले यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना रेनवडी गावचे नवनिर्वाचित चेअरमन मुकेश डेरे म्हणाले की निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून रेनवडी येथे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करत एक सामाजिक संदेश देण्याचा आम्ही युवकांनी प्रयत्न केला आहे आजच्या काळामध्ये वाढदिवस साजरे करत असताना सामाजिक उपक्रम राबवून साजरी करणे गरजेचे आहे.
यावेळी उपस्थित रेनवडी गावचे नवनिर्वाचित चेअरमन मुकेश डेरे, व्हा.चेअरमन बाबाजीशेठ येवले, ग्रामपंचायत सदस्य दत्ता येवले, सामाजिक कार्यकर्ते संदीप भोर, उत्तम येवले, ग्रामपंचायत कर्मचारी किसन जाधव, मुख्यध्याप मावळे सर, नवले सर व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.