वेब टीम : मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे...
वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. आदित्य ठाकरे आज सावंतवाडीत बंडखोर दीपक केसरकारांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
आदित्य ठाकरे हे राज्यभरात दौरा करत आहेत. आदित्य ठाकरे यांचा उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत दौरा आहे. पण या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून त्यांनी शिवसैनिकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या उद्या होणार्या सावंतवाडीतील नियोजित दौर्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील मिरवणूक उद्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांच्या घरासमोरुन जाणार होती.
पण यावरुन कोणताही वाद नको पोलिसांनी शिवसैनिकांना दीपक केसरकर यांच्या घरासमोरुन मिरवणूक नेण्यास मनाई केली आहे.
तर पर्याय म्हणून उद्यान परिसर किंवा चिटणीस नाक्यावरुन मिरवूणक काढा, अशा सूचनाही शिवसैनिकांना पोलिसांनी दिल्या आहेत.
मात्र पोलिसांच्या या भूमिकेबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चांगल्या कामात अपशकून नको म्हणून गप्प, अन्यथा आम्हाला वाटेल तिथून आम्ही मिरवणूक काढणार, असे राऊळ म्हणाले.
COMMENTS