भरती प्रक्रियेमध्ये कष्ट व मेहनत आवश्यक : नानासाहेब मोरे टाकळी ढोकेश्वर येथील स्वराज्य अकॅडमीत हर घर तिरंगा अभियान पारनेर/प्रतिनिधी : स्वतं...
भरती प्रक्रियेमध्ये कष्ट व मेहनत आवश्यक : नानासाहेब मोरे
टाकळी ढोकेश्वर येथील स्वराज्य अकॅडमीत हर घर तिरंगा अभियान
पारनेर/प्रतिनिधी :
स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात राबविले जात आहे. टाकळी ढोकेश्वर येथील स्वराज्य करियर अकॅडमी मध्ये हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले यावेळी अकॅडमी मधील विद्यार्थ्यांना ध्वज वितरण करण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी स्वराज्य करियर अकॅडमी टाकळी ढोकेश्वर यांनी स्तुत्य उपक्रम राबविला.
या कार्यक्रम प्रसंगी ढोकी येथील असलेले व सध्या मुंबई पोलीस मध्ये कार्यरत नानासाहेब मोरे हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी नानासाहेब मोरे यांनी स्वराज्य अकॅडमीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मोरे म्हणाले की आपण सर्वांनी राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी आपल्या घरावर प्रत्येकाने राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रीय एकात्मता ही खऱ्या अर्थाने जपली पाहिजे तसेच यावेळी पुढे ते म्हणाले की आजच्या युगामध्ये स्पर्धा अतिशय वाढली असल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या व विविध भरती प्रक्रिया मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कष्ट आणि मेहनत करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
स्वराज्य करियर अकॅडमी ने हर घर तिरंगा अभियान राबवून जनजागृती ही केली.
या कार्यक्रम प्रसंगी स्वराज्य करियर अकॅडमीचे संचालक सचिन मोरे, ढोकी येथील युवा नेतृत्व गोरख मोरे तसेच ॲकॅडमीतील विद्यार्थी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बोलताना सचिन मोरे म्हणाले की राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी व देश अभिमान जपण्यासाठी खऱ्या अर्थाने हर घर तिरंगा अभियान हा कार्यक्रम आम्ही अकॅडमी मध्ये घेतला आहे.